पुण्याच्या शिरपेचात आणखी एक तुरा; या गोष्टीसाठी मिळाला मान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune

पुण्याच्या शिरपेचात आणखी एक तुरा; या गोष्टीसाठी मिळाला मान

पुणे : पुण्यामध्ये घडणाऱ्या अनेक घटनांची दखल अनेक ठिकाणी घेतली जाते, एवढेच काय तर याबद्दल सर्वदूर चर्चादेखील केली जाते. त्यामुळेच पुणे तिथे काय उणे अशी म्हण प्रचलित आहे. याच म्हणीला साजेशी अशी बातमी पुणेकरांनासाठी असून, यामुळे पुणेकर असल्याचा गर्व नक्कीच तुम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही. (Pune Get First Rank In Family Friendships & Travel In Survey)

मायगेट लाइव्हबिलिटी इंडेक्सने (MyGate Liveability Index Survey) 2021 केलेल्या सर्वेक्षणात पुणे शहर हे वास्तव्याच्या दृष्टीने म्हणजेच गेटेडेट कम्युनिटी लिव्हिंगसह सर्वोत्तम उदयोन्मुख शहरांमध्ये दुसऱ्या स्थानावर असल्याचे म्हटले आहे. मायगेट लाइव्हबिलिटी इंडेक्सने केलेल्या सर्व्हेमध्ये रहिवाशांच्या सोसायट्यांच्या रेटिंगनुसार बंगळुरू (Bangalore) पहिल्या स्थावर आहे. तर पुणे (Pune) आणि अहमदाबाद (Ahmadabad) 10 पैकी सहा पॅरामीटर्सपैकी दोन पॅरामीटर्समध्ये अव्वल असल्याचे नमुद केले आहे.

मायगेट लाइव्हबिलिटी इंडेक्सने केलेले हे सर्व्हेक्षण बॅचलर-मित्रत्व, समुदाय सुरक्षितता, कौटुंबिक मैत्री, प्रवासातील सुलभता, पाळीव प्राण्याबद्दल मित्रत्व, स्वच्छता, सुविधांची गुणवत्ता, समाजातील घटनात्मकता आणि वृद्धांशी असलेले मित्रत्व आदी पॅरामीटर्सच्या आधारावर करण्यात आले आहे. सर्व्हेक्षणातून आलेला निकाल हा MyGate Liveability Index हे अॅप वापरणाऱ्या 25,000 गेटेड समुदायातील रहिवाशांच्या इनपुटवर आधारित होता. अहमदाबाद, बेंगळुरू, चेन्नई, दिल्ली-एनसीआर, हैदराबाद, कोलकाता, मुंबई आणि पुणे या शहरांमध्ये हे सर्व्हेक्षण करण्यात आले. (Best City's Of India )

सर्व्हेक्षणादरम्यान, बंगळुरू शहरात करण्यात आलेल्या सर्व्हेक्षणात बंगळुरू शहराला 10 पैकी 10 गुण प्राप्त झाले असून, कोलकाता (7.88) आणि दिल्ली-NCR (7.56) दुसऱ्या क्रमांकावर आहेत. बॅचलर फ्रेंडलीसमध्ये, अहमदाबादने 5.08 गुणांसह शेवटचे स्थान पटकावले आणि चेन्नईने पाळीव प्राणी-मित्रत्वाबाबत 4.77 गुण मिळवले आहेत. तर पुणेकरांनी कौटुंबिक मैत्री आणि प्रवासातील सुलभता या दोन श्रेणींमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. तर अहमदाबादनेदेखील सुविधांची गुणवत्ता आणि घटनात्मकता या दोन श्रेणींमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. (Pune Latest News In Marathi)

टॅग्स :Pune NewsTransport