आनंद महिंद्रा म्हणतात, माझा धंदाच बंद होईल

वृत्तसंस्था
शनिवार, 17 ऑगस्ट 2019

ट्विटर विपूल नावाच्या एका युजरने आपल्या वाढदिवसानिमित्त आनंद महिंद्रा यांच्याकडे एक मागणी केली. मी तुमचा खूप मोठा फॅन आहे. तुम्ही मला तुमच्या कंपनीची महिंद्रा थार माझ्या वाढदिवसानिमित्त भेट देऊ शकाल का?

मुंबई : सोशल नेटवर्किंग साईट ट्विटरवर महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा हे खूप सक्रीय असतात. आपल्या वेगवेगळ्या ट्विट्समुळे अनेकांचे लक्ष वेधून घेतात. एका खोडसाळ ट्विटर युजरला उत्तर देताना  'माझा धंदाच बंद होईल' असे म्हणाले, त्यामुळे त्यांनी दिलेले उत्तर पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. 

ट्विटर विपूल नावाच्या एका युजरने आपल्या वाढदिवसानिमित्त आनंद महिंद्रा यांच्याकडे एक मागणी केली. मी तुमचा खूप मोठा फॅन आहे. तुम्ही मला तुमच्या कंपनीची महिंद्रा थार माझ्या वाढदिवसानिमित्त भेट देऊ शकाल का?

त्याला उत्तर देताना आनंद महिंद्रा म्हणाले, आजच्या दिवसातील महत्त्वाचा शब्द म्हणजे अतिआत्मविश्वास. तुम्ही विपूलवर प्रेम करा किंवा त्याचा द्वेष करा. पण त्याच्या अतिआत्मविश्वासाची दखल घ्यावी लागेल. त्यासाठी त्याला पूर्ण मार्क द्यावे लागतील. पण विपूल मी तुझी मागणी काही पूर्ण करू शकत नाही. माझा धंदाच बंद होईल.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: If i keep gifting cars to everyone my business will go in vain says Anand Mahindra