कितीही आघाड्या करा, मोदी पहिल्याच क्रमांकावर असतील - आठवले

प्रशांत किशोर, ममता बॅनर्जी आणि काँग्रेसबाबतही केलं भाकीत
Ramdas-Athawale
Ramdas-Athawale

नवी दिल्ली : दिल्लीत राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यामध्ये नुकतीच गोपनीय बैठक पार पडली. या बैठकीनंतर भाजपला रोखण्यासाठी विरोधी पक्षांची संयुक्त आघाडी (United Front) स्थापन करण्याबाबत चर्चा सुरु झाली. या चर्चांवर आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधान मोदींविरोधात अशा कितीही आघाड्यात तयार झाल्या तरी ते पहिल्याच क्रमांकावर असतील असं आठवले यांनी म्हटलं आहे. (If many fronts formed against Modi but he will remain number one Ramdas Athawale)

आठवले म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात अशा कितीही आघाड्या स्थापन होऊ द्या त्यामुळं काहीही फरक पडत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नेतृत्व हे खूपच सक्षम असून त्यामुळेच ते सध्या पहिल्या क्रमांकावर आहेत. आम्हाला शरद पवारांप्रतीही आदर आहे. ते महाराष्ट्रातील दिग्गज नेते आहेत. त्यांनीही अनेक चांगली कामे केली आहेत. पण सध्याच्या परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस ही केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित आहे. महाराष्ट्राच्या बाहेर इतर राज्यांमध्ये त्यांच्या पक्षाला पुरेसं पाठबळ नाही."

ममता बॅनर्जींबाबत केलं महत्वाचं भाकीत

दरम्यान, आठवले यांनी ममता बॅनर्जींबाबतही एक भाकित केलं. ते म्हणाले, ममता बॅनर्जी आणि त्यांचा तृणमूल काँग्रेस पक्ष या नव्या आघाडीत समाविष्ट होणार नाही. कारण आधीच त्यांचे संसदेत मोठ्या संख्येनं खासदार आहेत. त्यामुळेच जरी सर्व विरोधीपक्ष एकत्र आले तरी त्यामुळे काही विशेष फरक पडणार नाही. प्रत्येकाला अशी कुठलीही आघाडी तयार करण्याचा अधिकार आहे. तसेच प्रत्येकाला लोकशाहीत निवडणूक जिंकण्यासाठी प्रयत्न करण्याचा अधिकार आहे. पण नरेंद्र मोदींना हरवणं तितकं सोप नाही. त्यामुळेच मला असं वाटतं की, शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली स्थापन होणाऱ्या आघाडीमध्ये काँग्रेस सामिल होणार नाही. त्याचबरोबर अनेक प्रादेशिक पक्ष सध्या एनडीएसोबत आहेत. तसेच जे पक्ष एनडीएसोबत नाहीत ते देखील सध्या संसदेत मोदी सरकारला पाठिंबा देत आहेत.

Ramdas-Athawale
राज्य शासनातर्फे मराठा आरक्षण पुनर्विचार याचिका दाखल

प्रशांत किशोर आणि शरद पवार यांच्या बैठकीबाबत बोलताना आठवले म्हणाले, "२०१४ च्या निवडणुकीत प्रशांत किशोर मोदींसोबत होते तेव्हा मोदींनी २२२ जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर २०१९ मध्ये किशोर मोदींसोबत नव्हते तेव्हा मोदींनी ३०३ जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे २०२४ मध्ये किशोर मोदींसोबत नसले तर ते ३५० जागा जिंकतील, याचा मला पूर्ण विश्वास आहे."

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com