Loksabha 2019 : '...तर रावणालाही मारल्याचे मोदी म्हणाले असते'

वृत्तसंस्था
गुरुवार, 4 एप्रिल 2019

'हा माणूस (नरेंद्र मोदी) इतका हुशार आहे की, जर ते श्रीलंकेत गेले असते तर आपणच रावणाला मारले आहे, असे सगळ्यांना सांगितले असते. कारण ते सोडून इतर कोणी काहीच काम करत नाही.'

बागहपत (उत्तर प्रदेश): पंतप्रधान नरेंद्र मोदी जर श्रीलंकेत गेले असते तर रावणलाही मारल्याचे त्यांनी सांगितले असते, असा टोला राष्ट्रीय लोकदलाचे प्रमुख अजित सिंह यांनी लगावला आहे.

नरेंद्र मोदी हे प्रचार सभांदरम्यान आपल्या सरकारने केलेल्या कामांचा उल्लेख करतात. यावरुन विरोधक त्यांच्यावर टीका करताना दिसतात. मोदींवर टीका करताना अजित सिंह म्हणाले, 'हा माणूस (नरेंद्र मोदी) इतका हुशार आहे की, जर ते श्रीलंकेत गेले असते तर आपणच रावणाला मारले आहे, असे सगळ्यांना सांगितले असते. कारण ते सोडून इतर कोणी काहीच काम करत नाही.'

'हा माणूस (नरेंद्र मोदी) अशा टोप्या घालून फिरत असतो, दुसरा कोणी घालत नाही. त्यांना या टोप्या कुठून मिळतात माहिती नाही. त्यांचे धैर्य तर बघा आपण भिकारी असल्याचे सांगतात. जर ते भिकारी असतील तर मलाही भिकारी करावे अशी मी देवाकडे प्रार्थना करतो. आम्हाला चौकीदार हवा असेल तर आम्ही नेपाळवरुन आणू पण आम्हाला पंतप्रधान हवा आहे' असेही अजित सिंह म्हणाले.

दरम्यान, अजित सिंह यांनी भाजपचा पराभव करण्यासाठी उत्तर प्रदेशात मायावती आणि अखिलेश यांच्याशी हातमिळवणी करत महाआघाडीत प्रवेश केला आहे. नागरिकांनी नरेंद्र मोदी यांच्या विरोधात घोषणा देण्यास सुरुवात केली असल्याचा दावा ते करत आहेत.

Web Title: if narendra modi had gone to sri lanka he would have told us that he is the one who killed ravana says RLD Chief Ajit Singh