गरज पडल्यास आणखी एकदा लक्ष्यवेधी हल्ले : लेफ्टनंट जनरल अंबुज

पीटीआय
सोमवार, 10 डिसेंबर 2018

डेहराडून : भारतीय लष्कर गरज पडल्यास आणखी एकदा दहशतवाद्यांविरुद्ध लक्ष्यवेधी हल्ले (सर्जिकल स्ट्राइक) करण्यास कोणताही संकोच करणार नाही, असे प्रतिपादन लष्कर उपप्रमुख लेफ्टनंट जनरल देवराज अंबुज यांनी आज येथे केले. 

सीमा ओलांडून दहशतवाद्यांच्या लॉंचपॅडवर भारताने लक्ष्यवेधी हल्ले केले होते. मात्र आता पुन्हा जर शत्रूने आम्हाला आव्हान दिले, तर तीच कृती करण्यास आम्ही मागेपुढे पाहणार नाही, असे लेफ्टनंट जनरल अंबुज यांनी स्पष्ट केले. डेहराडून येथील भारतीय मिलिटरी अकादमीच्या संचलन सोहळ्यानंतर वार्ताहरांनी विचारलेल्या प्रश्‍नांना उत्तरे देताना अंबुज बोलत होते. 

भारताने 29 सप्टेंबर 2016 मध्ये जम्मू-काश्‍मीरच्या उरी सेक्‍टरमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून दहशतवाद्यांवर हल्ला केला होता. तत्पूर्वी पाकपुरस्कृत दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 19 भारतीय जवान हुतात्मा झाले होते.

दरम्यान, शुक्रवारी निवृत्त लेफ्टनंट जनरल डी. एस. हुड्डा म्हणाले होते की, या लक्ष्यवेधी हल्ल्यांची फार चर्चा होणे गैर आहे, मात्र प्रथमच अशी कारवाई केल्याने त्याचा अभिमान असणेही स्वाभाविकच आहे. लक्ष्यवेधी हल्ल्याच्यावेळी हुड्डा लष्कराच्या उत्तरी कमांडचे प्रमुख होते. 

Web Title: If needed we will One more target attack says Lieutenant General Ambuj