PM Modi: सत्तेत पुन्हा येण्याची जनतेने संधी दिल्यास बेकायदा स्थलांतर रोखू : पंतप्रधान मोदी

PM Modi: सत्तेत पुन्हा येण्याची जनतेने संधी दिल्यास आमचे सरकार बेकायदा स्थलांतराचे प्रकार मोडून काढेल, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील सभेमध्ये दिली.
PM Modi Ramtek
PM Modi Ramtekesakal

पूर्णिया (बिहार): सत्तेत पुन्हा येण्याची जनतेने संधी दिल्यास आमचे सरकार बेकायदा स्थलांतराचे प्रकार मोडून काढेल, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील सभेमध्ये दिली. मतपेढीवर डोळा ठेवून राजकारण करणाऱ्यांमुळे बिहारमध्ये बेकायदा स्थलांतराचे प्रमाण वाढले असल्याचा आरोपही मोदी यांनी केला.

मोदींच्या आज पूर्णिया आणि गया येथे सभा झाल्या. मोदी म्हणाले,‘‘चार जूनचा निकाल सीमांचलचे भवितव्य ठरवेल. मतपेढीच्या राजकारणामुळे अनेक जणांना येथे बेकायदा राहण्याची परनवानगी पूर्वी दिली गेली. यामुळे सुरक्षेचा मोठा धोका निर्माण झाला असून दलितांसह अनेकांना त्याचा त्रास सहन करावा लागला आहे. त्यांच्यावर हल्ले झाले आहेत, घरे पेटवून दिली गेली आहेत.

PM Modi Ramtek
Atal Bihari Vajpayee: किस्से निवडणुकीचे! सभेला गर्दी नसल्यामुळे अटलजी स्वत: प्रचारासाठी मैदानात उतरले

सुधारित नागरिकत्व कायद्याला (सीएए) विरोध करणाऱ्यांनी लक्षात ठेवावे की कलम ३७० रद्द करणे, राममंदिर उभारणी आणि दहशतवादाला नियंत्रणात ठेवण्याची कामगिरी केल्यानंतरही आमचे सरकार स्वस्थ बसणार नाही. बेकायदा स्थलांतराचे प्रकार आम्ही मोडून काढू.’’

दोन्ही ठिकाणच्या सभांमध्ये मोदी यांनी डॉ. आंबेडकर आणि राज्यघटनेचा उल्लेख केला. गया येथे झालेल्या सभेत मोदी म्हणाले,‘‘गरीब, मागासवर्गीय आणि दलित यांचे माझ्यावर ऋण आहे असे मला वाटते. मी त्यांच्यातीलच एक आहे. आणि त्यामुळेच माझ्यासारख्या व्यक्तीलाही या पदापर्यंत पोहोचण्याची संधी देणाऱ्या घटनेचा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचाही मी ऋणी आहे.’’

PM Modi Ramtek
Naxalite: 'आमची माहिती दिली म्हणून मारले...' भाजप कार्यकर्त्याच्या हत्येनंतर नक्षलवाद्यांनी चिकटवले पोस्टर

मोदी म्हणाले...

 ही निवडणूक घटनेला व विकसित भारतासाठीच्या प्रयत्नांना विरोध करणाऱ्यांना शिक्षा करण्यासाठी

  •  राज्यघटना हा आमच्या श्रद्धेचा, तर विरोधकांच्या राजकारणाचा विषय

  •  समृद्ध भारत निर्माण करण्याची संधी काँग्रेसने गमावली आहे

  •  सामाजिक न्यायाच्या नावाखाली काँग्रेस व ‘राजद’कडून राजकारण

  •  विरोधकांकडून सनातन धर्माचा अवमान

PM Modi Ramtek
Viral Video: झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयने सिग्नलला थांबवली गाडी, अन् आश्चर्याने पाहू लागले सगळे.. व्हिडिओ होतोय व्हायरल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com