
सुप्रीम कोर्टाने एका निर्णयात सांगितलं की, महिलेसोबत लग्न करण्याचे दिलेले वचन सुरुवातीपासून खोटे असेल तरच त्याला बलात्कार मानले जाईल. सुप्रीम कोर्टाने ही टिप्पणी करताना बलात्कार प्रकरणातील एका आरोपीविरोधात चार्जशिट मागे घेण्याचा आदेश दिला आहे.
नवी दिल्ली- सुप्रीम कोर्टाने एका निर्णयात सांगितलं की, महिलेसोबत लग्न करण्याचे दिलेले वचन सुरुवातीपासून खोटे असेल तरच त्याला बलात्कार मानले जाईल. सुप्रीम कोर्टाने ही टिप्पणी करताना बलात्कार प्रकरणातील एका आरोपीविरोधात चार्जशिट मागे घेण्याचा आदेश दिला आहे. हे प्रकरण उत्तर प्रदेशच्या मथुरा जिल्ह्यातील आहे. न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड आणि एम आर शहा यांच्या पीठाने हा आदेश आरोपी सोनू याच्या विशेष याचिकेवर दिला आहे. सोनूने याचिकेमध्ये एफआयआर आणि चार्जशीट निष्क्रिय करण्याची विनंती केली होती. कोर्टाने आदेशात म्हटलंय की, एफआयआर आणि चार्जशीट वाचल्यानंतर स्पष्टपणे कळतंय की त्याने महिलेसोबत शारीरिक संबंध ठेवताना त्याचा लग्न करण्याचा कोणताही इरादा नव्हता किंवा त्याने संबंध ठेवताना लग्न करण्याचे खोटे वचन दिले होते.
पीठाने आपल्या निर्णयात सांगितलं की, आरोपी आणि पीडितेमधील संबंध एकमेकांच्या संमतीने ठेवण्यात आले होते. शिवाय त्यांच्यामध्ये जवळपास दीड वर्षांपासून संबंध होते. त्यानंतर जेव्हा आरोपीने लग्न करण्यास नकार दिला तेव्हा महिलेकडून एफआयआर दाखल करण्यात आली. याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये स्पष्टपणे उल्लेख करण्यात आलाय की तक्रारदार आणि आरोपीमध्ये एक वर्षापेक्षा अधिक काळापासून संबंध होते.
'अशा अधिकाऱ्यांना पोकळ बाबूंचे फटके द्या'; गिरिराज सिंह यांचं रोखठोख...
महिलेचा आरोप होता की, लग्नासाठी आरोपीचे कुटुंबीय तयार होते, पण ते आता नकार देत आहेत. महिलेची एकमेव तक्रार आहे की आरोपी सोनू तिच्यासोबत लग्न करत नाहीये. याप्रकरणात लग्न करण्यास नकार नंतर देण्यात आला, त्यामुळे एफआयआर दाखल करण्यात आली. त्यामुळे आम्हाला वाटतं या प्रकरणात बलात्काराचा आरोप होऊ शकत नाही. कारण यात असं वाटत नाही की लग्नाचे खोटे वचन देऊन संबंध ठेवण्यात आले आहेत.
कानून के हाथ बहुत लंबे होते है! पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणेला साताऱ्यात अटक
पीठाने सांगितलं की पीबी पवार विरुद्ध महाराष्ट्र प्रकरणात आम्ही स्पष्ट केलंय की कलम 375 अंतर्गत महिलेची सहमती कधी आणि कशी असेल. यासाठी दोन गोष्टी सिद्ध कराव्या लागतील. 1. लग्नाचे वचन खोटे असायला हवे, वाईट उद्देशाने प्रेरित असेल आणि त्याने वचन दिल्यानंतर तो पूर्ण करण्याचा त्याचा कोणताही इरादा नसेल 2. खोटं वचन नुकतंच दिलेलं असावं किंवा या वचनाचे आणि महिलेशी संबंध ठेवण्याच्या निर्णयाचा संबंध असावा.