esakal | 'जमत नसेल तर तसं सांगा, केंद्राकडे सोपवू'; कोर्टाने केजरीवालांना सुनावलं
sakal

बोलून बातमी शोधा

arvind kejariwal

देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना काही राज्यांमध्ये महामारीचा उद्रेक झाला आहे. विशेषत: दिल्ली, महाराष्ट्रामध्ये कोरोना स्थिती गंभीर बनली आहे. राजधानी दिल्लीत ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडत आहे.

'जमत नसेल तर तसं सांगा, केंद्राकडे सोपवू'; कोर्टाने केजरीवालांना सुनावलं

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली- देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना काही राज्यांमध्ये महामारीचा उद्रेक झाला आहे. विशेषत: दिल्ली, महाराष्ट्रामध्ये कोरोना स्थिती गंभीर बनली आहे. राजधानी दिल्लीत ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडत आहे. लोकांना बेड्स मिळत नाहीत. एकंदरीत आरोग्य सुविधा तोकड्या पडत असल्याने परिस्थिती हाताबाहेर जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच आता दिल्ली हायकोर्टाने महत्त्वाची टिपण्णी केली आहे. अरविंद केजरीवाल सरकारची सर्व सिस्टिम फेल ठरली आहे. राज्यात ऑक्सिजन सिलिंडरचा आणि कोरोनाविरोधात लढण्यासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या औषधांचा काळाबाजार होत आहे. त्यामुळे सरकारने परिस्थिती नियंत्रणात ठेवावी. त्यांना हे जमत नसेल, तर आम्ही केंद्र सरकारला सर्वकाही हातात घेण्याचे निर्देश देऊ, असं दिल्ली हायकोर्टाने म्हटलं आहे.

हेही वाचा: गंभीर रुग्णांना सरकारी कोविड सेंटरमध्येही ऑक्सिजन बेड नाही

दरम्यान, कोरोनाच्या प्रसाराने आणि ऑक्सिजनच्या तुटवड्याने बेहाल झालेल्या नवी दिल्लीला मंगळवारी थोडा दिलासा मिळाला. चार टँकरमधून ७० टन प्राणवायू वाहून आणणाऱ्या ऑक्सिजन एक्स्प्रेसचे आगमन आज सकाळी राजधानीत झाले. हा ऑक्सिजन दिल्ली सरकारतर्फे विविध रुग्णालयांना पुरविण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. शिवाय आणखी मदतीसाठी प्रयत्न सुरु आहेत.

हेही वाचा: राजधानी दिल्ली : आर्थिक आघाडीवरही कसोटी

रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी ‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ छ्त्तीसगडमधील रायगडमधून रुग्णांसाठी ऑक्सिजन घेऊन दिल्लीला पोचली आहे. कोरोनाविरुद्धच्या आपल्या एकत्रित लढ्यात जीव वाचविण्यासाठी भारतीय रेल्वे शक्य ते सर्व प्रयत्न करीत असून देशभरात प्राणवायूचा पुरेसा साठा उपलब्ध करीत आहे, ’ असे ट्विट केले आहे. ही ऑक्सिजन एक्स्प्रेस दिल्ली कँट रेल्वे स्थानकावर आज सकाळी पोचली. रायगड येथील जिंदाल स्टिल वर्क्स कारखान्यातून या रेल्वेने रविवारी (ता.२५) रात्री दिल्लीकडे कूच केले होते. फोर्टिस, मॅक्स, बी.एल. कपूर रुग्णालयासह अन्य रुग्णालयांमध्ये हा ऑक्सिजन पुरविण्यात येणार आहे.

loading image