'बार गर्ल इन इंडिया' म्हणून झळकत होतं सोनिया गांधींचे नाव

वृत्तसंस्था
शुक्रवार, 21 डिसेंबर 2018

नवी दिल्ली : आपण अनेकदा गुगलवर सर्च करत असतो. सर्च केलेली माहिती बऱ्याचदा महत्वपूर्णही असते. मात्र, आता गुगलच्या सर्चमध्ये 'बार गर्ल इन इंडिया' सर्च केल्यानंतर यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचे नाव दिसत होते. तसेच 'इडियट' सर्च केल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव झळकत आहे. 

भारतीय राजकारणात सोनिया गांधी यांचे नाव आघाडीवर आहे. मात्र, आता त्यांचे नाव 'बार गर्ल इन इंडिया' असे सर्च केल्यानंतर दिसत होते. याशिवाय 'भिकारी' म्हणून सर्च केल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे नाव दिसत आहे. तर 'इडियट' सर्च केल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव झळकत आहे. भारत, अमेरिका आणि पाकिस्तान या देशांतील मोठ्या नेत्यांची नावे अशाप्रकारे झळकत असल्याने गुगलवर टीका केली जात आहे. 

दरम्यान, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभांमध्ये सोनिया गांधी यांच्याविरोधात सोशल मीडियामध्ये मोहिम सुरु करण्यात आली होती. त्यामध्ये राजकारणात येण्यापूर्वी सोनिया गांधी बार डान्सर होत्या, असा मजकूर पसरवण्यात आला होता.

Web Title: If You Google Search For Bar Girl In India Sonia Gandhi Name was Shockingly The Top Result