वैष्णोदेवीचे चित्र असलेलं नाणं असेल तर व्हाल 10 लाखांचे मालक; जाणून घ्या

अनेक वेबसाइट्सवर जुन्या नोटा आणि नाणी विकून तुम्ही लाखो रुपये कमाऊ शकता.
Mata Vaishno Devi Devi Coin
Mata Vaishno Devi Devi CoinSakal

Mata Vaishno Devi Coin: आजच्या काळात जुन्या नोटा आणि नाण्यांच्या लिलावाचा बाजार खूप वाढला आहे. तुमच्याकडे काही जुन्या नोटा आणि नाणी असतील तर तुम्ही करोडपती होऊ शकता. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. वास्तविक असे काही लोक आहेत जे जुन्या नोटा आणि नाण्यांचा संग्रह ठेवतात. असे लोक जुन्या नोटा आणि नाणी घेण्यासाठी चांगली किंमत मोजतात. अशा अनेक वेबसाइट्स आहेत जिथे जुन्या नोटा आणि नाणी विकून लाखो रुपये कमावता येतात. (if you have coin with a picture of Mata Vaishnodevi, then you can get10 lakhs)

Mata Vaishno Devi Devi Coin
पत्नीचे पतीसमोरच प्रियकराशी शारीरिक संबंध; संतापलेल्या पतीने...

स्वातंत्र्यापूर्वीच्या 1 च्या चांदीच्या नाण्यासाठी तुम्हाला 2 लाख रुपये मिळू शकतात. दुसरीकडे माता वैष्णोदेवीचा शिक्का असलेले नाणे विकून तुम्ही 10 लाख रुपये कमवू शकता. एवढेच नाही तर अशी अनेक नाणी आहेत ज्यांना मागेल ती किंमत मिळते. एक नाणे 10 कोटींनाही विकले जाऊ शकते. एका रिपोर्टनुसार, ब्रिटिश भारतातील एका नाण्याला मोठी किंमत मिळाली आहे. ब्रिटीश राजवटीत 175 SSC मध्ये फार कमी लोकांकडे हे नाणे होते.

असेच एक चांदीचे नाणे आहे जे हिऱ्यापेक्षा जास्त किंमतीला विकत घेतले गेले. वास्तविक, हे नाणे जगातील सर्वात महाग नाणे आहे. हे नाणे अमेरिकेचे फ्लोइंग हेअर सिल्व्हर डॉलर आहे. 2013 मध्ये, एका कलेक्टरने 10 दशलक्ष डॉलर्समध्ये ते विकत घेतले. ही रक्कम सुमारे 67 कोटी रुपये आहे.

Mata Vaishno Devi Devi Coin
सोनं खरं की खोटं, कसं ओळखायचं?

जुनी नाणी विकण्यासाठी काय करावे?

ही नाणी आणि नोटा विकण्यासाठी तुम्ही Olx, Quikr, Ebay वर जाऊ शकता. या जुन्या नोटा आणि नाणी विकण्यासाठी, तुम्हाला ऑनलाइन विक्री किंवा लिलाव वेबसाइटवर तुमचे विक्रेता खाते तयार करावे लागेल. हे खाते तयार केल्यानंतरच तुम्ही काहीही विकू शकाल. येथे तुम्हाला तुमच्या नाण्याचा किंवा नोटेचा दोन्ही बाजूंनी फोटो काढून वेबसाइटवर अपलोड करावा लागेल. जेव्हा एखादा इच्छुक खरेदीदार ते पाहतो, तेव्हा तो तुमच्याशी संपर्क साधेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com