
भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था (IIIT) प्रयागराजमधील बीटेक आयटी विभागाच्या विद्यार्थ्याने संस्थेच्या इतिहासातील सर्वात मोठी प्लेसमेंट ऑफर मिळवत इतिहास घडवला आहे. विपुल जैन या विद्यार्थ्याला अमेरिकेतील रुब्रिक (Rubrik) या नामांकित कंपनीकडून तब्बल १.४५ कोटी रुपयांचं वार्षिक पॅकेज देण्यात आलं आहे. ही संस्था स्थापन झाल्यापासून मिळालेली आतापर्यंतची सर्वात मोठ्या पगाराची ऑफर ठरली आहे.