
प्रयागराजच्या महाकुंभ मेळ्यात आयआयटी बाबा म्हणून प्रकाशझोतात आलेल्या अभय सिंहची चौकशी करण्यासाठी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं होतं. सध्या तो एका हॉटेलमध्ये राहत आहे. अभय सिंहने सोशल मीडियावरून आत्महत्येची धमकी दिली होती. यानंतर शिप्रा पथ पोलीस ठाण्याचे पोलीस रिद्धि सिद्धि पार्क क्लासिक हॉटेलमध्ये पोहोचले. त्यांनी आयआयटी बाबाची चौकशीही केली.