
हरियाणातील काँग्रेसची युवा महिला नेता हिमानी नरवाल हिच्या हत्या प्रकरणी एकाला अटक करण्यात आलीय. हिमानीचा मृतदेह सुटकेसमध्ये भरून फेकून देण्यात आला होता. अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव सचिन असं असून हिमानी आणि आरोपी यांच्यात प्रेमसंबंध होते अशी माहिती समोर येत आहे. आरोपी हरियाणातील बहादुरगढचा असून पोलीस चौकशीत त्याने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.