

Heart Attack Report
esakal
हृदयविकाराच्या रुग्णांसाठी वेगवान निदान आणि आधुनिक उपचारांच्या दिशेने आयआयटी कानपूरने दोन महत्त्वपूर्ण तंत्रज्ञान विकसित केले आहेत. यामध्ये अवघ्या ६० ते ९० सेकंदांत अहवाल देणारा बायोसेंसर आणि हळद व मधाच्या कोटिंगचा बायोडिग्रेडेबल स्टेंट यांचा समावेश आहे. या संशोधनामुळे भविष्यात हृदयविकाराचे निदान आणि उपचार अधिक वेगाने करण्यास मदत होण्याची शक्यता आहे. आयआयटी कानपूरच्या बायो सायन्स अँड बायो इंजिनिअरिंग विभागातील प्रोफेसर संतोष कुमार मिश्रा आणि पीएच.डी. संशोधक तमोजीत सांतरा यांनी या तंत्रज्ञानावर काम केले आहे.