धक्कादायक! विदेशात चिमुरड्यांची मोठ्या प्रमाणात विक्री; गुजरात पोलिसांकडून रॅकेटचा पर्दाफाश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Illegal child trafficking on the Mexico-US border

सध्या लहान मुलांच्या तस्करीचं प्रमाण वाढलंय.

धक्कादायक! विदेशात चिमुरड्यांची मोठ्या प्रमाणात विक्री

अहमदाबाद : सध्या लहान मुलांच्या तस्करीचं प्रमाण वाढलंय. विदेशात चिमुरड्यांची मोठ्या प्रमाणात विक्री केली जात आहे. असं असतानाचं आता मुलांसोबत प्रवास करा आणि यूएसमध्ये प्रवेश मिळवा, अशी शक्कल लढवून मुलांची तस्करी केली जात आहे. गुजरातमधील पोलिसांनी हे धक्कादायक प्रकरण उघड केलंय.

मेक्सिको-यूएस सीमेवर (Mexico-US Border) बेकायदेशीर स्थलांतरितांना घुसखोरी करण्यात मदत करण्यासाठी अनेक संघटना कार्यरत आहेत. गुन्हेगारांनी प्रौढ स्थलांतरित आणि त्यांच्याशी संबंधित नसलेल्या मुलांना सीमा ओलांडताना 'एक कुटुंब' म्हणून उभं करण्याचा प्रयत्न केलाय. या दरम्यान पकडले गेल्यास, मुलांच्या उपस्थितीमुळं त्यांना यूएस सरकारनं आश्रयही दिलाय, असं धक्कादायक प्रकरण गुजरात पोलिसांनी (Gujarat Police) उघड केलंय. सध्या राज्यातील मानवी तस्करीवर कारवाई केली जात आहे.

जानेवारीमध्ये अमेरिकेत जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या कॅनडाच्या (Canada) सीमेजवळ गांधीनगरमधील डिंगुचा (Dingucha in Gandhinagar) येथील पटेल कुटुंबामधील चार जणांचा मृत्यू झाल्यानंतर, पोलिसांनी या महिन्यात अमेरिकेत स्थानिकांची तस्करी करणाऱ्या आठ एजंटचा पर्दाफाश केलाय. मानवी तस्करीच्या तपासादरम्यान पोलिसांना असं आढळून आलं की, अलीकडेच या पद्धतीचा वापर करून राज्यातील किमान आठ मुलांची विदेशात तस्करी करण्यात आलीय. मुलं बहुतेक 10 ते 15 वर्षे वयोगटातील आहेत. एका पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं की, तस्करी करणाऱ्या संघटना लहान मुलांना अमेरिकेत सोडण्यासाठी वस्तू म्हणून वापरत करतात. प्रौढ आणि मुलं अमेरिका-मेक्सिको सीमेवर धोकादायकरित्या प्रवास करताना दिसत आहेत. सीमा ओलांडण्यापूर्वी एजंट एक पुरुष, एक स्त्री आणि दोन मुलं - सर्व एकमेकांशी संबंधित नसलेले - एक फसवं कुटुंब तयार करतो, असं समोर आलंय.

सीमेवर पकडले गेल्यास, ते स्वत:ला एक कौटुंबिक घटक म्हणून सादर करतात आणि अमेरिकेत आश्रय घेतात. अमेरिकन सरकार (US Government) त्यांना डिटेंशन सेंटरमध्ये पाठवतं, जिथं स्थलांतरितांना निर्वासित कार्ड दिलं जातं. शेवटी, त्यांना तेथील वकिलांकडून कायदेशीर मदत घेऊन नागरिकत्व मिळतं, असं नमूद केलंय. आणखी एका पोलिस अधिकाऱ्यानं सांगितलं की, डमी कुटुंबाचा भाग असलेल्या प्रत्येक व्यक्तीकडून प्रत्येकी २५ लाख रुपये आकारले जातात. तुम्ही मुलांसोबत प्रवास केल्यास मेक्सिकोचा मार्ग अधिक सुरक्षित आहे. त्यामुळं लोक आता कॅनडापेक्षा या पद्धतीचा अवलंब करत आहेत. डिंगुचा प्रकरणानंतर मेक्सिकोच्या सीमेवरून घुसखोरीचं प्रमाण वाढलंय. 19 जानेवारीपासून सुमारे 250 प्रौढ आणि मुलं मेक्सिको सीमेवरून अमेरिकेत पळाली आहेत, असं सूत्रांनी सांगितलंय.

टॅग्स :GujaratCrime News