क्रिकेटपटू रवींद्र जाडेजाच्या पत्नी, सासूला कोर्टाकडून समन्स

Ravindra Jadeja wife Rivaba Jadeja
Ravindra Jadeja wife Rivaba Jadejaesakal
Summary

रिवाबा जडेजाच्या कारनं पोलिस कर्मचाऱ्याच्या दुचाकीला धडक दिली होती.

भारतीय क्रिकेटपटू रवींद्र जाडेजानं (Indian cricketer Ravindra Jadeja) मागील आठवड्यात श्रीलंकेविरुद्धच्या (Sri Lanka) T20 मालिकेत चमकदार कामगिरी केलीय. दरम्यान, रवींद्र जाडेजाचं कुटुंब पुन्हा एकदा चर्चेत आलंय. सुमारे चार वर्षे जुन्या एका प्रकरणात जामनगर न्यायालयानं (Jamnagar Court) रवींद्र जाडेजाची पत्नी रिवाबा जाडेजा (Rivaba Jadeja) आणि सासू यांना समन्स बजावलाय.

2018 मध्ये रिवाबा जाडेजानं आपल्या तक्रारीत पोलिस कॉन्स्टेबलनं (Police Constable) तिच्यावर हल्ला केल्याचा आरोप केला होता. हे प्रकरण कोर्टात सुरू होतं. दरम्यान, रिवाबा आणि तिच्या आईला कोर्टानं यापूर्वी अनेकदा बोलावलं होतं. मात्र, कोणीही न्यायालयात हजर राहिलं नाही. मिळालेल्या माहितीनुसार, आता न्यायालयानं दोघींना अंतिम समन्स पाठवलाय. तर, राजकोट पोलिसांनी (Rajkot Police) दोघींना लेखी समन्सही बजावलाय.

Ravindra Jadeja wife Rivaba Jadeja
CISF मध्ये नोकरीची मोठी संधी; महिन्याला मिळणार 'इतका' पगार

ही घटना मे 2018 मध्ये घडलीय. जेव्हा रिवाबा जाडेजाच्या कारनं पोलिस कर्मचाऱ्याच्या दुचाकीला धडक दिली. त्यानंतर दोघांमध्ये चांगलाच वाद झाला. त्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यानं रिवाबाला थप्पड मारल्याचा आरोप करण्यात आलाय. पोलीस मुख्यालयात पोहोचल्यानंतरच रिवाबानं याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. रवींद्र जाडेजा सध्या टीम इंडियाच्या महत्त्वाच्या सदस्यांपैकी एक आहे. अष्टपैलू जाडेजानं अलीकडच्या काळात फलंदाज म्हणून खूप सुधारणा केलीय. रवींद्र जाडेजा आणि रिवाबा यांचं 2016 मध्ये लग्न झालं होतं. दोघांना एक मुलगी देखील आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com