यूपीत धार्मिक स्थळांवरील ५३,९४२ भोंगे उतरवले, योगी सरकारची कारवाई

यूपीतील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून रविवारी ही माहिती देण्यात आली.
up
upgoogle
Summary

यूपीतील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून रविवारी ही माहिती देण्यात आली.

भोंग्यासंदर्भातील वादावरून मागील काही दिवस राजकारण चांगलंच तापलं आहे. मनसेने घेतलेल्या आक्रमक भूमिकेची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशातील धार्मिक स्थळांवर असलेले ५३,९४२ बेकायदा भोंगे उतरवण्यात आले आहेत. यूपीतील योगी सरकारने हा निर्णय घेतला आहे. यानुसार एकूण ६० हजार भोंग्यांचे आवाज हे नियमाच्या अधीन असल्याचे आढळून आले आहेत. यूपीतील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून रविवारी ही माहिती देण्यात आली. (Loud Speakers At Religious Places)

up
सरदार पटेल यांचा पुतळा भारत-कॅनडा संबंधांचे प्रतीक : PM मोदी

उत्तर प्रदेशातील धार्मिक स्थळांवर असलेले बेकायदा भोंगे आणि लाऊडस्पीकर उतरवण्यासाठी २६ एप्रिलपासून विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत ५३ हजार ९४२ भोंगे उतरवण्यात आले असून ६०,२९६ भोंगे हे आवाज नियमानुसार असल्याचे दिसले, असे अतिरिक्त महासंचालक प्रशांत कुमार यांनी सांगितले. पुढील काही दिवस ही मोहीम सुरू राहणार असल्याचे गृहमंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच कोणत्याही विशिष्ट धर्माला लक्ष्य न करता सर्व प्रार्थनास्थळांची तपासणी करण्यात येत असल्याचे प्रशांत कुमार यांनी नमूद केले. उतरवले गेलेले भोंगे हे बेकायदा होते. कोणतीही परवानगी न घेता बसवण्यात आले होते. त्याचीच तपासणी करून ही कारवाई करण्यात येत असल्याचे ते म्हणाले.

up
उमरान मलिकच्या हंगामातील सर्वात 'वेगवान' चेंडूवर ऋतुराजचे अर्धशतक

दरम्यान, सन २०१७मध्ये उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशी अंमलबजावणी करण्याचा हा भाग असल्याचेही त्यांनी म्हटले. चार दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी उत्तर प्रदेशातील भोंगे उतरवल्याच्या कारणाने योगी सरकारचे कौतुक केले होते. यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होते. या कौतुकाच्या पत्रावरून महाराष्ट्र सरकारनेही राज ठाकरे आणि मनसे यांना टोले लगावले होते. आधी टीका करणारे आता कसे काय योगींचे गीत गायला लागले असा सवालही राजकीय वर्तुळातून उपस्थित केला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com