
उमरान मलिकच्या हंगामातील सर्वात 'वेगवान' चेंडूवर ऋतुराजचे अर्धशतक
पुणे : सनराईजर्स हैदराबादचा वेगावान गोलंदाज उमरान मलिक (Umran Malik) यंदाच्या आयपीएलमध्ये दिवसेंदिवस आपल्या वेगाची मर्यादा रूंदावत चालला आहे. त्याने चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) विरूद्धच्या सामन्यात यंदाच्या हंगामातील सर्वात वेगवान चेंडू टाकला. यापूर्वी उमरान मलिक 153.1, 153.3, 152.9 किमी प्रती तास अशा वेगाने गोलंदाजी करत होता. मात्र आजच्या सामन्यात त्याने थेट 154 किमी प्रती तास वेगाचा चेंडू टाकला. हा चेंडू त्याने ऋतुराज गायकवाडला (Ruturaj Gaikwad) टाकाला. विशेष म्हणजे या चेंडूवरच ऋतुराजने चौकार मारत अर्धशतक पूर्ण केले. ऋतुराज गायकवाडने आजच्या सामन्यात 57 चेंडूत 99 धावांची खेळी केली. त्याचे शतक अवघ्या 1 धावने हुकले. त्याला टी नटराजनने बाद केले.
हेही वाचा: पुण्याच्या ऋतुराजने 'पुण्यात' षटकार मारत केला मैलाचा दगड पार
चेन्नई बॅटिंग करत असताना 10 वे षटक टाकणाऱ्या उमरान मलिकने 154 किमी प्रती तास वेगाने चेंडू टाकला. हा अखूड टप्प्याच्या चेंडूवर ऋतुराजने पूल मारण्याचा प्रयत्न केला होता. मात्र चेंडू इतक्या वेगाने आला की हा चेंडू ऋतुराजच्या बॅटची कडा घेऊन विकेट किपरच्या डोक्यावरून सीमारेषेच्या पार गेला.
हेही वाचा: मोहसीन खानने दिल्लीला गुंडाळले; लखनौ पोहचला दुसऱ्या स्थानावर
यंदाच्या आयपीएल हंगामात जे पाच सर्वात वेगवान चेंडू टाकले गेले आहेत. त्यातील चार चेंडू हे उमरान मलिकने टाकले होते. यापूर्वी न्यूझीलंडचा वेगावान गोलंदाज लॉकी फर्ग्युसनने 153.9 किमी वेगाने चेंडू टाकला होता. तर उमारन मलिकने टाकलेले 153.3, 153.1 आणि 152.9 किमी प्रती तास वेगाने चेंडू टाकले होते. आज त्याने 154 किमी प्रती तास वेगाने चेंडू टाकून हंगामातील सर्वात वेगावन चेंडू (IPL 2022 Fastest Ball) टाकण्याचा विक्रम आपल्या नावावर केला. उमरान मलिकच्या वेगाची चर्चा आयपीएलमध्ये सुरू आहे. त्याला भारतीय संघात स्थान मिळावे अशी मागणी अनेक दिग्गज खेळाडू करत आहेत. ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या टी 20 वर्ल्डकपमध्ये भारतीय संघात स्थान देण्यात यावे अशी मागणी होत आहे.
Web Title: Umran Malik Fastest Ball In Ipl 2022 Ruturaj Gaikwad Hit Half Century
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..