
IMA Asks Why Arrest Doctor Who Prescribed Government Approved Medicine
Esakal
मध्य प्रदेशात कफ सिरप प्यायल्यानं १४ पेक्षा जास्त लहान मुलांचा मृत्यू झाला. तर काही जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी डॉक्टर सोनी यांना अटक करण्यात आली आहे. आता या डॉक्टरच्या बचावासाठी इंडियन मेडिकल असोसिएशन पुढे आले आहे. प्रशासकीय आणि नियामक मंडळांच्या गंभीर बेजबाबदारपणाचा हा परिणाम असल्याचं आयएमएने म्हटलंय. औषध लिहून देणाऱ्या डॉक्टरना अटक हे कायद्याचं अज्ञान दाखवणारं उदाहरण आहे. पीडित कुटुंब आणि डॉक्टर दोघांनाही नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशनने दिलीय.