यंदा सरासरीच्या 97 टक्के पाऊस: हवामान खाते

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 एप्रिल 2018

नवी दिल्ली: स्कायमेटपाठोपाठ भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) सुद्धा यंदा सरासरी 97 टक्के पाऊस पडेल असा अंदाज वर्तविल्याने बळीराजा सुखावणार आहे. आयएमडीने पावसाचा पहिला अंदाज वर्तवला असून, हवामान विभागाने आज (सोमवार) पत्रकार परिषद घेऊन पाऊसमान कसा राहिल याबाबतची माहिती दिली.

गेल्या वर्षी आयएमडीने 96 मिलीमीटर पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला होता. त्याप्रमाणे पाऊस 95 टक्के पडला होता. यंदाही सरासरी 97 टक्के एवढा पाऊस पडेल असा अंदाज वर्तविला आहे.

स्कायमेटचा अंदाज काय?
देशभरात यंदा समाधानकारक मान्सून राहील, असा पहिला अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे. सध्याची परिस्थिती, समुद्राचे तापमान, वाऱ्याची गती यावरुन हा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे. यंदा सरासरीच्या 100% पाऊस पडेल, असं स्कायमेटने म्हटले आहे. महाराष्ट्रात तर उत्तम पाऊसमान असेल, असेही स्कायमेटने म्हटले आहे.

मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक या शहरात पाऊसमान सामान्य राहील. मराठवाड्यातही यंदा चांगला पाऊस पडण्याचा अंदाज आहे. येत्या जून महिन्यात सर्वाधिक 111 टक्के पाऊस पडण्याचा अंदाज आहे, तर ऑगस्टमध्ये तुलनेने कमी म्हणजेच 96 टक्के पाऊस पडेल. दुष्काळाच्या परिस्थितीचा अंदाज शून्य टक्के म्हणजे काहीच नाही, असाही वर्तवण्यात आला आहे.

कोणत्या महिन्यात किती पाऊस? (स्कायमेटच्या अंदाजानुसार)
- जूनमध्ये 111 टक्के पाऊस
- जुलैमध्ये 97 टक्के पाऊस
- ऑगस्ट 96 टक्के पाऊस
- सप्टेंबर 101 टक्के पाऊस

सरासरी पाऊस म्हणजे किती?
890 मिमी पाऊस सरासरी मानला जातो, त्याच्या 19 टक्के कमीअधिक पाऊस पडला तरी तो सरासरी इतका मानला जातो.

आयएमडीचा अंदाजः
2016 मध्ये सरासरीच्या 106 टक्के
2017 मध्ये 100 टक्के

Web Title: imd forecasts average monsoon rains in 2018