उष्णतेच्या लाटेत होरपळणाऱ्या उत्तरेत पावसाची शक्यता : IMD

हवामान खात्याच्या या अंदाजामुळे गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळणार आहे.
IMD
IMD sakal media

नवी दिल्ली : राजस्थान, दिल्ली, पंजाब आणि हरियाणामध्ये 2 मे पासून पाऊस (Rain) आणि गडगडाटी वादळाचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून (IMD) वर्तवण्यात आला आहे. हवामान खात्याच्या या अंदाजामुळे गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळणार आहे. 2 ते 4 मे पर्यंत राजस्थान, दिल्ली, पंजाब आणि हरियाणामध्ये पाऊस आणि वादळाची शक्यता हवामान विभागने वर्तवली असून, यामुळे तापमान 36 आणि 39 अंश सेल्सिअसपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे, असे आयएमडीचे वरिष्ठ शास्त्रज्ञ आरके जेनामानी यांनी सांगितले. (IMD Whether Forecast )

IMD
गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी यांना विनयभंग प्रकरणात जामीन मंजूर

तत्पूर्वी, हवामान खात्याने सांगितले की, दिल्लीचे तापमान 0.5-1 अंशांनी वाढू शकते आणि काही भागात 46 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर, हरियाणातील काही भागांमध्ये तापमान 46 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमानाची (Heat Wave) नोंद होऊ शकते, असादेखील अंदाज वर्तवण्यात आला आहे.

हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, 4 मे रोजी अंदमान (Andman) समुद्रात चक्रीवादळ विकसित होईल, त्यानंतर 5 मे रोजी कमी दाबाची स्थिती निर्माण होईल. यामुळे कमाल तापमानात घट होण्याची शक्यता आहे. पूर्व भारतातील ओडिशा, बिहार, बंगाल आणि झारखंडमधील तापमानात आजपासून किंचित घट झाल्याचेही हवामान विभागने म्हटले आहे. तर, ओडिशाती झारसुगुडा, संबलपूर, बालंगीर आणि अंगुल भागात उद्यापासून तापमान खाली येण्यास सुरुवात होईल असेही जेनामनी यांनी सांगितले. याशिवाय IMD ने 29 एप्रिल ते 1 मे या कालावधीत पश्चिम राजस्थान, पंजाब, हरियाणा, दिल्ली, पश्चिम उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि झारखंड या सात राज्यांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com