चीनमधून वस्तू मागवणाऱ्या व्यापाऱ्यांना झटका; कस्टम विभागाची नवी खेळी

वृत्तसंस्था
रविवार, 28 जून 2020

  • चीनमधून वस्तू मागवणाऱ्या उद्योगपतींना भारतीय कस्टम विभागाचा दणका

मुंबई : भारतीय कस्टम विभागाने चीनमधून वस्तू मागवणाऱ्या उद्योगपतींना चांगलाच दणका दिला आहे. यापुढे चीनमधून वस्तू मागवताना उद्योगपतींनी विचार करावा यासाठी कस्टम विभागाची नवी खेळी केली आहे. भारत-चीनमध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या चकमकीचा फटका भारतीय उद्योगपतींना बसला आहे. चीनमधून भारतात मागवण्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, खेळणी, मोबाईलचं कंसाईंनमेंट कस्टमच्या गोडाऊनमधे पडून आहे. त्यामुळे उद्योगपतींचे मोठं नुकसान होत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

देशातील अनेक गोडाऊनमध्ये चीनहून आलेला माल तसाच पडून आहे. या पार्श्वभूमीवर इंडिया सेल्लुलर आणि इलेक्ट्रॉनिक गुड्सचे चेअरमन पंकज महींद्रू यांनी केंद्रीय रिव्हेन्यू सचिवांना पत्र लिहिलं आहे. डीएचएल या कुरिअर कंपनीने चीन, हाँगकाँग आणि मकाओ इथून कुरिअर सर्विसेस रद्द केल्याची माहिती जारी केली आहे. त्यामुळे चीनवरुन मागवलेला माल आता असाच पडून राहणार असल्याने उद्योगपतींना फटका बसणार आहे.
--------------
प्रत्येक रविवारी होणार लॉकडाऊन; राज्य सरकारचा मोठा निर्णय
--------------
कोरोना रुग्णांची संख्या १ कोटीवर; तर मृत्यूंची संख्या...
--------------
चिनी सैन्यासोबत गलवान खोऱ्यात झालेल्या धुमश्चक्रीत भारताचे 20 जवान शहीद झाल्यानंतर भारतात चीनविरोधात संतापाची लाट उसळली आहे. त्यानंतर देशात चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकावा, असं अनेकांनी आपले मत मांडत सांगितले आहे. भारतानेही चीनसोबतचे आर्थिक व्यवहार रद्द केले आहेत. त्यामुळे चीनला मोठा आर्थिक फटका बसणार असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांशी झालेल्या संघर्षांत २० भारतीय जवान शहीद झाल्याचे भारताने स्पष्ट केले होते. यात चीनचे ४० हून अधिक सैनिक ठार झाल्याचे भारतीय लष्कराने, तसेच काही वृत्तसंस्थांनी म्हटले होते; पण चीनने त्यांच्या मनुष्यहानीबाबत मौन बाळगले होते. या पार्श्वभूमीवर चीनने पहिल्यांदाच मनुष्यहानीची कबुली दिली आहे. या संघर्षात कमांडिंग ऑफिसरसह १६ सैनिक मारले गेल्याची कबुली चीनने दिली आहे. मागील आठवड्यात चीनने राजनैतिक आणि लष्करी चर्चेत ही कबुली दिली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Impact of boycott China campaign on consumers uncertain

टॅग्स
टॉपिकस