डॉ. मनमोहन सिंगाचा सल्ला पंतप्रधानांनी विनम्रतेना मानावा : राहुल गांधी

Important advice from former PM Manmohan Singh hope PM Modi accepts it says Rahul Gandhi
Important advice from former PM Manmohan Singh hope PM Modi accepts it says Rahul Gandhi

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विनम्रतेने मानायला हवा, अशी अपेक्षा काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी व्यक्त केली आहे. ट्विट करत राहुल गांधी यांनी ही अपेक्षा व्यक्त केली आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

लडाखच्या गलवान खोऱ्यातील भारत-चीन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मोदी सरकारला उद्देशून एक पत्र लिहले आहे. या पत्रात डॉ. मनमोहन सिंग यांनी दिलेले सल्ले हे देशाच्या हिताचे आहेत. त्यामुळे मी आशा करतो की, पंतप्रधान मोदी विनम्रतेने हे सल्ले स्वीकारतील, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. हे पत्रही राहुल गांधी यांनी ट्विट केले आहे.
--------
अमेरिकेनंतर ब्राझील बनतोय कोरोनाचा हॉटस्पॉट; मृतांची संख्या झाली एवढी
--------
सलग सोळाव्या दिवशीही इंधन दरवाढीचे मीटर सुसाट
--------

दरम्यान, भारत-चीन संघर्षानंतर राहुल गांधी दररोज ट्विट करुन मोदी सरकारवर टीका करताना दिसत आहेत. गलवान खोऱ्यात भारतीय सैनिकांना निशस्त्र का पाठवले इथपासून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गलवान खोऱ्याचा प्रदेश चीनला बहाल केला का, असे अनेक प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित केले आहेत. त्यामुळे सध्या भाजप आणि काँग्रेस नेत्यांमध्ये कालच जुंपली आहे. काल (ता. २१) राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये नरेंद्र मोदी यांचा उल्लेख थेट सरेंडर मोदी असा केला होता. यावरून भाजप नेते चांगलेच आक्रमक झाले होते. राहुल गांधी यांचे हे ट्विट भारतीय सैन्य आणि जनतेचा अपमान आहे. त्यामुळे राहुल गांधी यांनी देशवासियांची माफी मागावी, अशी मागणी भाजप नेत्यांनी केली होती. 

त्याचबरोबर, राहुल गांधी यांनी सॅटेलाईट फोटोमधून चीनने भारतीय हद्दीत घुसखोरी केल्याचं दिसत आहे, असं म्हणतही पंतप्रधानांवर टीका केली होती. कोणीही आपल्या हद्दीत घुसखोरी, कब्जा केलेला नाही, असं पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं असून सॅटेलाईट फोटो, ईमेजमध्ये पांगोंग तलावाजवळील, भारत माता या पवित्र भूमीवर चीनने कब्जा केल्याचं स्पष्ट दिसत असल्याचं राहुल गांधी यांनी सांगितंल. आज तक या हिंदी वृत्तवाहिनेने दाखविलेला व्हिडिओ ट्विट करत राहुल गांधी यांनी पंतप्रधानांवर ही टीका केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com