विजय मल्ल्याला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; अवमान प्रकरणातील याचिका फेटाळली

Supreme Court,  Vijay Mallya
Supreme Court, Vijay Mallya

किंगफिशर एअरलाइन्सचे मालक विजय मल्ल्या याची कोर्टाचा केलेल्या अवमानबद्दलची पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. भारतीय बॅंकाचे पैसे बुडवून फरार झालेल्या विजय मल्ल्याने कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन करून आपल्या मुलांच्या अकांऊटला 40 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचे हस्तांतरण (transfer) केले होते. याबद्दलची कोणतीही माहिती माल्ल्याने कोर्टाला दिली नव्हती. यामूळेच सर्वोच्च न्यायालयाने 2017 च्या मे महिन्यात मल्ल्याला कोर्टाचा अवमान केल्याबद्दल दोषी ठरविले होते. कोर्टाच्या या निर्णयानंतर विजय मल्ल्याने न्यायालयात पुनर्विचार  याचिका दाखल केली होती, त्यावर न्यायमूर्ती यू.यू. ललित आणि अशोक भूषण यांच्या खंडपीठाने गुरुवारी (27 ऑगस्ट) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी घेत आपला निर्णय राखून ठेवला होता. ही याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. 

'आपली मालमत्ता उघड न करणे आणि मालमत्ता चुकीच्या पद्धतीने लपविण्याचा प्रयत्न करणे असे दोन आरोप विजय मल्ल्यावर कोर्टाने लावले होते. या प्रकरणात गेल्या तीन वर्षात संबंधित कोर्टासमोर मल्ल्याची पुनर्विचार याचिका का सूचीबद्ध केली गेली नाही, हे स्पष्ट करण्यासाठी कोर्टाने जूनमध्ये त्यांच्या रजिस्ट्रीला सांगितले. गेल्या तीन वर्षात याचिका संबंधित फाइल पाहिलेल्या अधिकाऱ्यांच्या नावांसह सर्व माहिती न्यायालयाने रजिस्ट्रीला मागितली होती. मल्ल्या यांनी 2017मध्ये न्यायालयाच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्यासाठी याचिका दाखल केली आहे ज्यात मालमत्तेची माहिती लपवत  कोर्टाचा अवमान केल्याबद्दल दोषी ठरले होते.

सर्वोच्च न्यायालयाने 2017मध्ये सांगितलं होतं की, मल्ल्याच्या शिक्षेवरील निर्णय प्रत्यर्पणानंतर होईल. जेव्हा मल्ल्याला भारतात आणले जाईल तेव्हा त्याला न्यायालयात हजर करावे, असेही न्यायालयाने म्हटले होते. यापूर्वी 9 मे 2017 रोजी माल्ल्याने संपत्तीची संपूर्ण माहिती न दिल्याने सर्वोच्च न्यायालयाने मल्ल्याला कोर्टाचा अवमान केल्याबद्दल दोषी मानले. तसेच 10 जुलैला मल्ल्याला कोर्टाने सर्वोच्च न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

किंगफिशर एअरलाइन्सचा प्रमुख असलेल्या विजय मल्ल्यावर 9 हजार कोटींची फसवणूक केल्याचा तसेच मनी लाँडरिंगचा आरोप आहे. 2012 साली किंगफिशर एअरलाईन्स सुरु केल्यानंतर अति-महत्वाकांक्षेने विजय मल्ल्या अडचणीत सापडला होता. परिणामी मल्ल्याला बँकांकडून कर्ज घेण्याशिवाय परिरय उरला नाही. मात्र कर्जाची परतफेड करण्यास असमर्थ ठरल्यानंतर मल्ल्याने इंग्लंड मध्ये आश्रय घेतला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com