esakal | IITच्या विद्यार्थ्याचं महत्त्वपूर्ण संशोधन; कोरोना लढ्यात होणार मदत
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Symptoms

IITच्या विद्यार्थ्याचं महत्त्वपूर्ण संशोधन; कोरोना लढ्यात होणार मदत

sakal_logo
By
टीम ई सकाळ

पाटना : कोरोना संक्रमणाचा धोका अद्याप टळलेला नाहीये. त्यामुळे कोणत्याही प्रकारची ढिलाई न बाळगता कोरोना नियमांचं पालन आजही आवश्यक आहे. सध्या आपल्याकडे कोरोना विषाणूशी दोन हात करु शकेल, असं औषध उपलब्ध नाहीये. लस हेच एकमेव शस्त्र या लढ्यामध्ये उपलब्ध आहे. मात्र, आता हा लढा आणखी सोपा व्हावा, यासाठी काही नवनवी संशोधने पुढे येत आहेत.

हेही वाचा: दिल्ली दहशतवाद्यांच्या रडारवर! पोलिस कमिश्नरनी घेतली खबरदारीची बैठक

IIT ने बनवलं विशेष सॉफ्टवेअर

भारतीय प्रौद्योगिकी संस्था अर्थात आयआयटीच्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागाने एक विशेष सॉफ्टवेअर विकसित केलं आहे. या सॉफ्टवेअरमुळे रुग्णांच्या एक्स-रे फिल्मच्या माध्यमातून हे समजेल की रुग्णाला कोरोना आहे की निमोनिया आहे? आर्टिफिशियल इंटेलिजेन्सच्या आधारावर बनवल्या गेलेल्या या सॉफ्टवेअरमध्ये एक्स-रे डेटाच्या माध्यमातून रुग्णाला कोणत्या प्रकारचे संक्रमण आहे, याची माहिती मिळते. हे संशोधन एल्जेवियरच्या बायोसिग्नल प्रोसेसिंग अँड कंट्रोल जर्नलमध्ये प्रकाशित देखील झालं आहे.

हेही वाचा: आर्थिक गणित बिघडणार; सलग सहाव्या दिवशी पेट्रोल-डिझेलची दरवाढ!

95 टक्क्यांपर्यंत अचूक

हे संशोधन आयआयटी पाटनाचे डॉ. राजीव कुमार झा यांच्या मार्गदर्शनाखाली सागरदीप या विद्यार्थ्याने केलं आहे. डॉ. राजीव कुमार झा यांनी सांगितलंय की, यामध्ये डीप लर्निंग टेक्निकचा वापर केला आहे. या संशोधनासाठी एमजीएम मेडिकल कॉलेज, इंदौरची टीम आणि एम्स, पाटनाचे डॉ. कमलेश झा यांचे सहकार्य मिळाले आहे. त्यांनी म्हटलंय की, कोरोना संक्रमित, सामान्य आणि निमोनिय संक्रमित लोकांच्या एक हजार एक्स-रे इमेजच्या आधारावर ट्रेंड नेटवर्क तयार केलं गेलं आहे. या सॉफ्टवेअरमधून मिळणारे निष्कर्ष हे 95 टक्के योग्य आहेत.

तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवरील महत्त्वपूर्ण संशोधन

कोरोना संक्रमणाची तिसरी लाट येण्याची शक्यता अनेक तज्ज्ञांकडून वारंवार व्यक्त केली गेली आहे. त्या पार्श्वभूमीवर हे संशोधन अत्यंत महत्त्वपूर्ण मानलं जात आहे. कोरोना आणि निमोनिया या दोन्ही रोगांचं लक्षण एकसारखंच असतं. त्यामुळे या दोन्हीमध्ये फरक करणं अवघड बनतं. त्यामुळेच रुग्णांची आरटीपीसीआर तपासणी तसेच एचआरसीटी टेस्ट देखील करण्याची गरज भासते.

loading image
go to top