प्रियांका गांधी म्हणतात, 'सरकारने कॉमेडी सर्कस करू नये'

पीटीआय
Saturday, 19 October 2019

- सरकारचे काम आहे देशाची कोसळणारी अर्थव्यवस्था सुधारणे

- कॉमेडी सर्कस करणे नव्हे

नवी दिल्ली : नोबेल विजेते अर्थशास्त्रज्ञ अभिजित बॅनर्जी यांनी दिलेल्या आर्थिक सल्ल्याची खिल्ली उडविणाऱ्या केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्यावर आज काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी जोरदार टीका केली. सरकारचे काम हे देशाची कोसळणारी अर्थव्यवस्था सुधारणे हे असून, कॉमेडी सर्कस करणे नव्हे; असा टोला त्यांनी लगावला आहे. 

तत्पूर्वी बॅनर्जी यांनी काँग्रेसच्या न्याय योजनेचे कौतुक केले होते, त्यावर गोयल यांनी मतदारांनीच ही योजना नाकारल्याचे सत्य त्यांनी स्वीकारावे असे मत मांडले आहे. तसेच पुण्यामध्ये बोलताना त्यांनी बॅनर्जी यांच्यावर डाव्या विचारसरणीचा शिक्काही मारला होता. या संदर्भात प्रियांका यांनी आज केलेल्या ट्‌विटमध्ये म्हटले आहे की, बॅनर्जी यांनी त्यांचे काम प्रामाणिकपणे करून नोबेल सन्मान मिळवला आहे. सध्या कोसळणारी अर्थव्यवस्था सावरणे हे तुमचे काम असून, कॉमेडी सर्कस करणे नव्हे, अशी टीका प्रियांका यांनी केली आहे.

प्रियांका यांनी या ट्‌विटबरोबरच मागील काही महिन्यांतील औद्योगिक घसरणीची माहिती देणाऱ्या बातम्यांची कात्रणेही पोस्ट केली आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Improve economy do not create circus says Priyanka Gandhi