भारताचा पाकला इशारा; इम्रान खान यांची पळापळ

वृत्तसंस्था
Thursday, 7 May 2020

भारताने पाकिस्तानला इशारा दिल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची चांगलीच पळापळ झाली आहे.

अहमदाबाद : भारताने पाकिस्तानला इशारा दिल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची चांगलीच पळापळ झाली आहे. पाकिस्तानच्या दहशतवादी कारवायांना चोख प्रत्युत्तर दिले जाईल असा इशारा भारताने दिला आहे. त्यामुळे इम्रान खान यांनी टि्वट करुन आपली चिंता व्यक्त केली आहे. हंदवाडामध्ये दोन दिवसात दोन वेगवेगळया घटनांमध्ये कर्नल, मेजरसह एकूण आठ जवान शहीद झाले. यावर भारताने पाकिस्तानला इशारा दिला होता.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

इम्रान खान म्हणाले, 'सध्या तणावग्रस्त परिस्थिती आहे. तिचा फायदा घेत, घुसखोरी होत असल्याचा आरोप भारताकडून होण्याची शक्यता आहे. तसेच याच्या आडून भारत पाकिस्तानविरोधात लष्करी कारवाईचा बागुलबोवा उभा करण्याची शक्यता आहे. पाकिस्तान विरोधात लष्करी कारवाईचा बागुलबोवा उभा करण्यासाठी भारत सातत्याने कारणं शोधत आहे. नियंत्रण रेषेवरुन घुसखोरी होत असल्याचा आरोप तथ्यहीन असून भारताच्या खतरनाक अजेंडयाचा भाग असल्याचीही टीका इम्रान खान यांनी केली आहे.

धक्कादायक ! गॅस गळतीमुळे ७ जणांचा मृत्यू तर, ५०००हून अधिकांची प्रकृती गंभीर

दहशतवादी कारवायांना चोख प्रत्युत्तर दिले जाईल असा इशारा भारताने दिला होता. त्यानंतर उलट भारत काश्मीरमध्ये स्थानिक हिंसाचार घडवत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. भारतातील सत्ताधारी म्हणजे भाजपच्या धोरणांमुळे दक्षिण आशियातील शांतता धोक्यात येऊ शकते असेही ते म्हणाले आहेत. त्याआधी आंतरराष्ट्रीय समुदायाने पावले उचलावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Imran Khan claims India could launch false flag operation against Pakistan