इम्रान खान यांना भारतीय मंत्र्यांनी दिले उत्तर; ‘होय, कारण तुमच्याकडे सिद्धू आहे’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

imran khan

इम्रान खान यांना मंत्र्यांनी दिले उत्तर; ‘होय, तुमच्याकडे सिद्धू आहे’

आपल्या देशाची आर्थिक स्थिती भारतापेक्षा चांगली असल्याचा दावा पाकिस्तानचे (Pakistan) पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांनी केला. यानंतर केंद्रीय मंत्र्यांनी बुधवारी इम्रान खान यांची खिल्ली उडवली. इम्रान खानच्या वक्तव्यावर अनेक भारतीय नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. राजीव चंद्रशेखर हेही त्यापैकी एक आहे.

इंटरनॅशनल चेंबर समिट २०२२ च्या उद्घाटन समारंभाला संबोधित करताना इम्रान खान (Imran Khan) म्हणाले की, अनेक आव्हाने असूनही पाकिस्तानची (Pakistan) आर्थिक स्थिती भारतापेक्षा चांगली आहे. पाकिस्तान अजूनही स्वस्त देशांपैकी एक आहे. विरोधक आम्हाला अक्षम म्हणतात. परंतु, सत्य हे आहे की आमच्या सरकारने देशाला सर्व संकटांपासून वाचवले आहे. इतर देशांच्या तुलनेत पाकिस्तानमध्ये (Pakistan) तेलाच्या किमती कमी आहे, असेही इम्रान खान म्हणाले.

हेही वाचा: नात्याला काळिमा! भाच्याने मित्रासोबत मामीवर केला सामूहिक बलात्कार

इम्रान खानच्या दाव्याला प्रत्युत्तर देताना चंद्रशेखर यांनी ट्विट केले, ‘होय, कारण तुमच्याकडे सिद्धू आहे. आम्ही सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहोत. सर्वाधिक युनिकॉर्न कंपन्या आणि विदेशी गुंतवणूकदार आमच्याकडे आहे.’

काँग्रेस (Congress) नेते अभिषेक सिंघवी यांनीही इम्रान खानच्या दाव्यावर प्रतिक्रिया व्यक्त करत ट्विट केले की, ‘आपल्या आर्थिक साठ्याबद्दल बोलण्यासाठी इम्रान खान पाकिस्तानचा जगातील सर्वांत स्वस्त देश म्हणून उल्लेख करतात. सौदीकडून भीक मांगता. जमीन आणि संसाधने चीनला देता आणि जगण्यासाठी गाढवे विकता.’

Web Title: Imran Khan Pakistan Indian Bjp Congress Leader

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..