Hemant Soren: हेमंत सोरेन यांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात फ्रिज, स्मार्ट टीव्हीच्या पावत्यांची एन्ट्री; ईडीची मोठी खेळी

ED: ईडीच्या म्हणण्यानुसार, ही जमीन मूळत: 'भुइनहरी' मालमत्ता होती जी सामान्य परिस्थितीत कोणालाही हस्तांतरित किंवा विकली जाऊ शकत नाही.
Hemant Soren|ED
Hemant Soren|EDEsakal

Hemant Soren Money Laundering Case:

काही दिवसांपूर्वी झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यावर अंमलबजावणी संचालनालयाने कारवाई केली होती. हेमंत सोरेन यांनी 31 कोटी रुपयांहून अधिक किमतीची 8.86 एकर जमीन बेकायदेशीरपणे विकत घेतल्याचा आरोप ईडीने केला होता.

दरम्यान ईडीने या दाव्याचे समर्थन करण्यासाठी वापरलेल्या पुराव्यांमध्ये रेफ्रिजरेटर आणि स्मार्ट टीव्हीचे इनव्हॉइस जोडले आहेत.

केंद्रीय तपास संस्था ईडीने या पावत्या रांचीस्थित दोन डीलर्सकडून मिळवल्या आणि गेल्या महिन्यात माजी मुख्यमंत्री आणि झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते आणि इतर चार जणांविरुद्ध त्या पुरावा म्हणून आरोपपत्रात जोडल्या आहेत.

मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर सोरेन यांना 31 जानेवारी रोजी कथित जमीन हडप केल्याप्रकरणी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने अटक केली होती. ते सध्या रांची येथील होटवार येथील बिरसा मुंडा तुरुंगात न्यायालयीन कोठडीत आहेत.

ईडीच्या म्हणण्यानुसार, दोन गॅजेट्स फ्रिज आणि स्मार्ट टीव्ही संतोष मुंडा यांच्या कुटुंबीयांच्या नावावर खरेदी करण्यात आले होते ज्यांनी ईडीला सांगितले की, ते हेमंत सोरेन यांच्या या जमिनीवर गेल्या 14 ते 15 वर्षांपासून केअरटेकर म्हणून राहत आहेत.

Hemant Soren|ED
BJP Workers: निवडणुकांसाठी पैशाचा पाऊस! रेल्वे स्टेशनवर 4 कोटींची रोकड जप्त, भाजप कार्यकर्त्यासह तिघांना बेड्या

ईडीने मुंडा यांच्या या विधानाचा वापर सोरेन यांच्या या जमिनीशी कोणताही संबंध नसल्याच्या दाव्याला विरोध करण्यासाठी केला.

ईडीने जमिनीच्या तुकड्यावरील राजकुमार पहान नावाच्या व्यक्तीचा दावाही फेटाळला, आणि आरोप केला की, सोरेन यांची मालमत्ता आपल्या नियंत्रणाखाली ठेवण्यासाठी त्याला पुढे केले होते.

ईडीने दावा केला की, गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये सोरेन यांना या प्रकरणी पहिले समन्स बजावण्यात आल्यानंतर, पाहन यांनी रांचीच्या उपायुक्तांना पत्र लिहून सांगितले होते की, सध्या ही जमीन त्यांच्या आणि इतर काहींच्या ताब्यात आहे आणि इतर मालकांच्या नावावर यापूर्वी केलेले फेरफार रद्द करण्यात यावे. आणि त्यांना त्यांच्या मालमत्तेतून बेदखल होण्यापासून वाचवले जाऊ शकते.

Hemant Soren|ED
Gwadar Port: लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर 'कच्छथिवू'नंतर आता 'ग्वादर' आलं चर्चेत; नेहरुंनी नाकारली ऑफर, मग पाकिस्तानने घेतलं गाव

राज्य सरकारने हेमंत सोरेन यांच्या अटकेच्या दोन दिवस आधी, 29 जानेवारी रोजी ही जमीन पुन्हा एकदा पहान यांच्या ताब्यात दिली. जेणेकरून सोरेन यांचे नियंत्रण आणि ताबा कायम राहील, असा ईडीचा आरोप आहे.

ईडीच्या म्हणण्यानुसार, ही जमीन मूळत: 'भुइनहरी' मालमत्ता होती जी सामान्य परिस्थितीत कोणालाही हस्तांतरित किंवा विकली जाऊ शकत नाही आणि 'मुंडा' आणि 'पहाण' हे अशा जमिनीच्या मालमत्तेचे मालक होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com