Jammu-Kashmir: SPO च्या हत्येमध्ये सहभागी असलेल्यांसह 4 दहशतवादी ठार, सुरक्षा दलांची चकमक सुरू

मुलू येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एक दहशतवादीही ठार
Jammu-Kashmir: SPO च्या हत्येमध्ये सहभागी असलेल्यांसह 4 दहशतवादी ठार, सुरक्षा दलांची चकमक सुरू

जम्मू-काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यातील द्रास येथे सुरक्षा दलाच्या सुरू असलेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले आहेत. हे तीन दहशतवादी जैश-ए-मोहम्मदशी संबंधित असल्याचे सांगण्यात येत आहे. मंगळवारी सायंकाळी ही चकमक सुरू झाली. याशिवाय मुलू येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एक दहशतवादीही ठार झाला आहे.

ADGP काश्मीर यांनी सांगितले की, द्रास, शोपियान येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले आहेत. हे तिन्ही दहशतवादी स्थानिक असून ते जैश-ए-मोहम्मद संघटनेशी संबंधित असल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय सुमारे दोन तासांपूर्वी मुलू येथेही सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली आहे. येथेही एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला असून, येथे अजूनही सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हनान बिन याकूब आणि जमशेद हे दोन दहशतवादी एसपीओ जावेद दार आणि पश्चिम बंगालमधील एका मजुराच्या हत्येत सामील होते. 2 ऑक्टोबरला दहशतवाद्यांनी एसपीओची हत्या केली होती. याशिवाय 24 सप्टेंबर रोजी दहशतवाद्यांनी बंगालमधील एका मजुराची हत्या केली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com