आम्ही लसीकरणाचं कवरेज ६० वरुन ९० टक्क्यावर नेलं - पंतप्रधान

कल्पना करा, आज आपल्याकडे भारतात बनवलेली लस नसती तर...
narendra modi
narendra modinarendra modi

नवी दिल्ली: "कोरोनासारख्या (corona virus) अदृष्य आणि रुप बदलणाऱ्या शत्रूविरोधात कोविड प्रोटोकॉल हे सर्वात मोठं अस्त्र आहे. मास्क, सोशल डिस्टन्सिंग या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. लस सुरक्षा कवच आहे. आज संपूर्ण जगात लसीची जी मागणी आहे, त्या तुलनेत उत्पादन करणारे देश आणि लस बनवणाऱ्या कंपन्या फार कमी आहेत. कल्पना करा, आज आपल्याकडे भारतात बनवलेली लस नसती तर आज भारतासारख्या विशाल देशात काय स्थिती असती?" असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. ते देशाला संबोधित करत आहेत. (In our govt vaccine coverage increase from 60 percent to 90 percent pm modi)

"गेल्या ५०-६० वर्षांचा इतिहास बघितला, तर भारताला परदेशातून लस मिळवण्यासाठी दशक लागायची. पोलिया, स्मॉल पॉक्स, हेपिटायटस बी या लसींसाठी देशाने दशकांपर्यंत वाट बघितली. २०१४ मध्ये देशवासियांनी आम्हाला सेवेची संधी दिली. २०१४ मध्ये भारतात लसीकरणाचं कवरेज ६० टक्के होतं. आमच्या दृष्टीने ही चिंतेची बाब होती. ज्या वेगाने लसीकरणाचा कार्यक्रम सुरु होता, त्या वेगाने देशाल शतप्रतिशत लसीकरणासाठी ४० वर्ष लागली असती. लसीकरण वेगाने व्हावे, यासाठी आम्ही 'मिशन इंद्रधनुष्य' लाँच केलं. आम्ही मिशन मोडमध्ये काम केलं. पाच ते सहा वर्षात ६० टक्क्यावरुन आम्ही लसीकरणाचा वेग वाढवून ९० टक्के केलं" असा दावा पंतप्रधान मोदींनी केला.

"आम्ही लसीकरणाचा वेग वाढवला व विस्तारही केला. आम्ही लहान मुलांना प्राणघातक रोगांपासून वाचवण्यासाठी नव्या लसीकरण मोहिमेचा भाग बनवला. आम्हीला लहान मुलांची, गरीबांच्या मुलांची चिंता होती. आम्ही शत-प्रतिशत लसीकरणाच्या दिशेने जात होतो. त्यावेळी कोरोना व्हायरसने घेरलं" असं मोदी म्हणाले.

"आज मी तुमच्याशी बोलत असताना २३ कोटीपेक्षा जास्त लसींचे डोस दिले आहेत. आम्हाला पूर्ण विश्वास होता की, आमचे वैज्ञानिक कमी वेळात लस बनवण्यात यशस्वी ठरतील. वैज्ञानिक संशोधन करत असताना लॉजिसि्टिक आणि दुसरी तयारी सुरु केली होती. मागच्यावर्षी एप्रिलमध्ये कोरोनाचे काही हजार केसेस असताना लस बनवणाऱ्या कंपन्यांना प्रत्येक मदत केली. संशोधन आणि विकासासाठी मदत केली" असा दावा मोदींनी केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com