जलद माहिती देण्यास उपयुक्‍त डॉपलर व्हेदर रडारचे उद्‌घाटन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 जून 2018

पणजी : देशात एकूण 27 अत्याधुनिक सेवांनी युक्‍त असणारे डॉपलर रडार आहेत. येत्या काही वर्षात मेंगलोर, अहमदाबाद, रत्नागिरी आणि मुंबईसह देशातील काही भागात एकूण 9 नवे डॉपलर रडार उभे करण्यात येणार असल्याची माहिती भूशास्त्र मंत्रालयाचे सचिव डॉ. एम. राजीवन यांनी दिली. 

गोवा हवामान खात्यातर्फे आज हवामानाची जलद माहिती देण्यास उपयुक्‍त ठरणाऱ्या डॉपलर व्हेदर रडारचे उद्‌घाटन करण्यात आले, यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर भारतीय हवामान खात्याचे संचालक डॉ. के. जे रमेश, गोवा हवामान खात्याचे संचालक डॉ. मोहनलाल साहू आणि मुंबई हवामान खात्याचे संचालक डॉ. गोसाळीकर आदी उपस्थित होते. 

आकाशामध्ये होणाऱ्या बदलांचा आधार घेत या डॉपलर रडारमुळे हवामानाची माहिती लवकर मिळण्यास सहाय्य होणार आहे, ज्यामुळे अनेक नैसर्गिक संकटांचा सामना करण्यासाठीची पुर्ववत तयारी करता येईल. समुद्रकिनारी भागांमध्ये वादळ किंवा अतिवृष्टी होणार असेल तर त्याची पूर्वसूचना मिळाल्याने मासेमाऱ्यांसह सागरी भागातील लोकांना मदत होईल. हे डॉपलर रडार 500 किमीच्या अंतरावरील हवामानाची माहिती देत असल्याने गोव्यासारख्या लहान राज्याला त्याचा चांगला उपयोग होणार असल्याची माहिती डॉ. साहू यांनी यावेळी दिली. 

Web Title: Inauguration of Doppler Weather Radar, suitable for providing quick information