Indian Science Congress : 2015 पर्यंत भारत 81 व्या क्रमांकावर होता, आता 40 व्या क्रमांकावर आहे - PM मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे 108 व्या भारतीय विज्ञान काँग्रेसचं उद्घाटन केलं.
Indian Science Congress Narendra Modi
Indian Science Congress Narendra Modi esakal
Updated on
Summary

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे 108 व्या भारतीय विज्ञान काँग्रेसचं उद्घाटन केलं.

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे 108 व्या भारतीय विज्ञान काँग्रेसचं उद्घाटन केलं. राष्ट्रसंत तुकोजी महाराज नागपूर विद्यापीठात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.

या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, नरेंद्र सिंह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित आहेत. यावेळी संबोधित करताना PM मोदी म्हणाले, 'विज्ञानक्षेत्रात भारतानं मोठी प्रगती केली आहे. भारताकडं तंत्रज्ञान आणि डेटाची मोठी शक्ती आहे. तंत्रज्ञानाचा वैज्ञानिक उपयोग वाढविण्याचं आमचं ध्येय आहे.'

Indian Science Congress Narendra Modi
Sanjay Raut : भाजपला छत्रपती शिवाजी महाराजांचं महत्व मान्य नाही का? संजय राऊतांचा थेट सवाल

भारत स्टार्टअपच्या बाबतीत जगात पहिला तीन देशात आहे. तंत्रज्ञान आणि मनुष्यबळ एकमेकांना पूरक आहेत. त्यामुळं विज्ञान, संशोधनाला गती देण्याचं आमचं ध्येय आहे. शेवटच्या घटकापर्यंत विज्ञान पोहोचायला हवं. ज्ञानातून जगाचं भलं करणं, हेच संशोधनाचं कर्तव्य आहे, असंही मोदींनी सांगितलं.

भारताच्या विकासात वैज्ञानिकांची भूमिका खूप महत्त्वाची आहे. गेल्या 8 वर्षात अनेक विलक्षण गोष्टी घडल्या आहेत. विज्ञान क्षेत्रात भारत झपाट्यानं जगातील अव्वल देशांमध्ये सामील होत आहे. आजचा भारत ज्या वैज्ञानिक दृष्टिकोनानं पुढं जात आहे, त्याचे परिणामही आपण पाहत आहोत. 2015 पर्यंत आम्ही 130 देशांच्या जागतिक निर्देशांकात 81 व्या क्रमांकावर होतो आणि 2022 मध्ये आम्ही 40 व्या क्रमांकावर पोहोचलो आहोत, असंही मोदी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com