

Inchal Ancient Coins
esakal
बेळगाव : सौंदत्ती तालुक्यातील इंचल गावात बीसीएम वसतिगृहाजवळ व्हीबी-जी-रामजी योजनेअंतर्गत सुरू असलेल्या खोदकामादरम्यान मजुरांना १४ पुरातन नाणी सापडली. नाणी स्वतःकडे न ठेवता मजुरांनी ती तत्काळ इंचल ग्रामपंचायत कार्यालयात आणून अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सुपूर्द केली. शुक्रवारी काम सुरू असताना जमिनीत ही नाणी आढळून आली.