esakal | खूशखबर! आयकर विभागाचा करदात्यांना मोठा दिलासा
sakal

बोलून बातमी शोधा

income-tax

आयकर विभागाने शुक्रवारी आयटीआर रिटर्न (प्राप्तीकर) भरण्याच्या अंतीम तारखेमध्ये वाढ केली आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

खूशखबर! आयकर विभागाचा करदात्यांना मोठा दिलासा

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली- आयकर विभागाने शुक्रवारी आयटीआर रिटर्न (प्राप्तीकर) भरण्याच्या अंतीम तारखेमध्ये वाढ केली आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. आयकर विभागाने जारी केलेल्या माहितीनुसार, आयटीआर भरण्याची अंतीम तारीख 30 नोव्हेंबर, 2020 पर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे करदात्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

आता एटीएममधून पैसे काढतानाही लागणार OTP
आयकर विभागाच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन ही माहिती देण्यात आली आहे. सध्या निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेऊन, आम्ही आयटीआर भरण्याची मुदत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आता, वित्तिय वर्ष 2019-20 साठी आयटीआर भरण्याची तारीख 30 नोव्हेंबर, 2020 असेल. आम्ही आशा करतो की यामुळे अनेकांना फायदा होईल, असं आयकर विभागाने ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

एका दिवसापूर्वीच आयटी विभागाने वित्तिय वर्ष 2019-20 साली कर बचत गुतंवणूक/देयकाची मुदत 31 जूलैपर्यंत वाढवली होती. त्यानंतर आयकर विभागाचा हा निर्णय आला आहे. यामुळे करदात्यांना 31 जूलैपर्यंत वित्तिय वर्ष 2019-20 साठी आयकर कायद्यानुसार वजावटीसाठी दावा करता येणार आहे.

भगवान बुद्धांनी जगाला जगण्याचा मार्ग दाखवला : मोदी
केंद्राने आधारकार्ड पॅनशी जोडण्याची मुदतही 31 मार्च 2021 पर्यंत वाढवली आहे. त्यामुळे ज्यांनी अजून आपले आधारकार्ड पॅनशी जोडले नाहीत, त्यांना अधिकची मुदत मिळणार आहे. याशिवाय आयटी विभागाने 31 जूलैपर्यंत वित्तिय वर्ष 2019-20 साठी टीडीस ( टॅक्स डिडक्टेड अॅट सोर्स)/ टीसीएस( टॅक्स कलेक्टेड अॅट सोर्स) ची मुदत 31 जूलैपर्यंत वाढवली आहे. तसेच  वित्तिय वर्ष 2019-20 साठी टीडीस आणि टीसीएस प्रमाणपत्र 15 ऑगस्टपर्यंत भरता येणार आहे.

loading image