esakal | Income Tax अधिकारीही चक्रावले! जेव्हा ऑफिसच्या कपाटात सापडले 550 करोड....
sakal

बोलून बातमी शोधा

income tax raid

Income Tax अधिकारी चक्रावले! ऑफिसच्या कपाटात सापडले 550 कोटी

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

हैदराबाद : येथील एका नामांकित फार्मास्युटिकल कंपनीवर आयकर विभागाकडून छापेमारी (IT raids) करण्यात आली होती. त्यावेळी तिथला प्रकार पाहून आयकर विभागाचे अधिकारीही चक्रावले, कारण कार्यालयात चक्क 550 कोटी (550 crore found in a office) सापडले. नेमका प्रकार काय?

तपासादरम्यान अनेक गोष्टींचा खुलासा

सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सच्या मते, आयकर विभागाने 6 ऑक्टोबर रोजी हेटेरो फार्मास्यूटिकल ग्रुपवर नुकतीच छापेमारी केली. या छापेमारीदरम्यान आयकर विभागाचे अधिकारीही चक्रावले. कारण, हेटेरो फार्मास्टूटिकलच्या कार्यालयात आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना एका कपाटात तब्बल 142 कोटी रुपये सापडले आहेत. इतर गोष्टी मिळून आतापर्यंत सुमारे 550 कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता सापडली आहे.आयकर विभागाच्या छाप्यावेळी खात्यांची पुस्तकं आणि रोख रक्कम मिळून आलीय. डिजिटल उपकरणे, पेन ड्राईव्ह, अनेक कागदपत्रे या छापेमारीच जप्त करण्यात आली आहेत. या छापेमारीवेळी अनेक बनावट आणि अस्तित्वात नसलेल्या कंपन्यांकडून करण्यात आलेल्या खरेदीबाबत मोठा घोटाळा झाल्याचा दावा करण्यात येत आहे. त्याचबरोबर, जमीन खरेदीसाठी पैसे भरल्याचा पुरावाही सापडला आहे. त्यात कंपनीच्या पुस्तकांमधील वैयक्तिक खर्च आणि संबंधित सरकारी नोंदणी मूल्याच्या खाली खरेदी केलेली जमीन, याचा समावेश आहे. अधिकारी म्हणाले की, तपासादरम्यान अनेक बँक लॉकर सापडले आहेत, त्यापैकी 16 लॉकर चालवले जात आहेत. अघोषित उत्पन्न शोधण्यासाठी आयकर विभागाकडून पुढील तपास सुरू आहे.

हेही वाचा: Maharashtra Bandh : राज्यात काय सुरू, काय बंद? जाणून घ्या..

6 राज्यातील 50 ठिकाणी तपासणी मोहीम

ही कंपनी आपल्या अधिकाधिक उत्पादनांची निर्यात विदेशात करते. त्यात USA, यूरोप, दुबई आणि अन्य आफ्रिकी देशांचा समावेश आहे. आयकर विभागाने 6 राज्यातील जवळपास 50 ठिकाणी तपासणी मोहीम राबवली आहे.

हेही वाचा: वयाच्या 80 व्या वर्षी अमिताभ एवढे उत्साही कसे, जाणून घ्या कारणं

loading image
go to top