esakal | 'सब याद रखा जाएगा'; सरकारच्या 'त्या' दाव्यावर संतापले राहुल गांधी
sakal

बोलून बातमी शोधा

Rahul-Gandhi

'सब याद रखा जाएगा'; सरकारच्या 'त्या' दाव्यावर संतापले राहुल गांधी

sakal_logo
By
विनायक होगाडे

नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या दरम्यान ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे कोणत्याही रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याचं वक्तव्य केंद्र सरकारने केलं आहे. सरकारच्या या वक्तव्यावर सध्या देशात संतापाचं वातावरण आहे. विरोधक माध्यमांतील बातम्यांचा हवाला देत सरकारच्या या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. राहुल गांधी यांनी आज गुरुवारी एक ट्विट करत सरकारच्या या दाव्यावर हल्लाबोल केला आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय की, 'सगळं लक्षात ठेवलं जाईल!' त्यांनी ऑक्सिजनच्या कमतरतेसंदर्भातील माध्यमांमधील बातम्यांचा हवाला देत सरकारला काही प्रश्न विचारले आहेत. गेल्या मंगळवारी राज्यसभेमध्ये सरकारने आपल्या एका लिखित उत्तरात म्हटलंय की, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये कोणत्याही राज्यात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे रुग्णाचा मृत्यू झाला नाहीये.

हेही वाचा: तिसऱ्या लाटेची टांगती तलवार

हेही वाचा: National Mango Day : आंबा भारत अन् पाकिस्तानचे राष्ट्रीय फळ

सरकारच्या दाव्यावर संताप

सरकारच्या या दाव्यानंतर लोकांमध्ये संतापाचं वातावरण आहे. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे आपल्या जीवलगांना गमावलेले नातेवाईक सध्या सोशल मीडियावर आपल्यासोबत आलेले अनुभव शेअर करत आहेत. सरकारचं म्हणणं आहे की, राज्यांनी जे रिपोर्ट्स पाठवले आहेत, त्या आधारावर त्यांनी हा दावा केला आहे. सरकारने संसदेत म्हटलंय की, त्यांनी राज्यांकडून पाठवल्या गेलेल्या माहितीच्या आधारावरच हा दावा केला आहे.

हेही वाचा: इतर राज्यातील पुरुषालाही होता येणार जम्मू-काश्मिरचा रहिवाशी

आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी राज्यसभेतील एका प्रश्नाच्या लिखित उत्तरात म्हटलंय की, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या कोरोना मृत्यूबाबत माहिती देण्यासाठी सविस्तर गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. त्यानुसारच, राज्य नियमित रुपाने केंद्र सरकारकडे कोरोना मृत्यूबाबत आणि त्याच्या कारणांबाबतची माहिती पाठवतात. मात्र, कोणत्याही राज्याने ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे मृत्यू झाल्याची माहिती दिली नाहीये.

loading image