IT Raid : डोलो-650 च्या ठिकाणांवर इन्कम टॅक्सची छापेमारी

कोरोनाच्या काळात डोलो-६५० गोळ्यांची मोठ्या प्रमाणावर झाली होती विक्री
Dolo650
Dolo650
Updated on

नवी दिल्ली : पॅरासिटामोल टॅब्लेट बनवणाऱ्या डोलो-६५० कंपनीवर आणि तिच्या मालाकांच्या विविध ठिकाण्यांवर प्राप्तिकर विभागानं बुधवारी छापेमारी केली. बंगळुरुस्थित मायक्रो लॅब्स लिमिटेड या कंपनीनं डोलो-६५० हे टॅब्लेट बनवलं आहे. कंपनीच्या या कार्यालयावरही छापे टाकण्यात आले आहेत. (Income tax raids on Dolo 650 drug company and owner premises)

Dolo650
सरकारची मोठी घोषणा! बुस्टर डोसचा कालावधी झाला कमी

प्राप्तिकर विभागाच्या माहितीनुसार, बुधवारी देशातील ४० ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली. या कारवाईमध्ये सहभागी झालेल्या २०० अधिकाऱ्यांनी डोलो कंपनीच्या विविध ठिकाणांवर छापेमारी केली. यामध्ये बंगळुरु येथील मुख्यालय, नवी दिल्ली, सिक्कीम, पंजाब, तामिळनाडू आणि गोवा येथील कार्यालयांचा समावेश आहे. मायक्रो लॅब्सचे सीएमडी दिलीप सुराना आणि संचालक आनंद सुराना यांच्या घरांवरही छापेमारी करण्यात आली आहे.

Dolo650
मुख्तार अब्बास नक्वी यांचा अल्पसंख्यांक मंत्रीपदाचा राजीनामा

बंगळुरु येथील मायक्रो लॅब्स लिमिटेडच्या कार्यालयात छापेमारीदरम्यान अधिकाऱ्यांनी महत्वाच्या कागदपत्रांची तपासणी केली. कंपनीनं करचोरी केल्याचा आरोप प्राप्तिकर विभागानं केला आहे, त्याच संदर्भात ही छापेमारी करण्यात आल्याचं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.

कोरोना काळात कमावला मोठा नफा

कोविडच्या काळात डोलो-६५० गोळ्यांची मोठ्या प्रमाणावर विक्री झाली होती. कोरोनाग्रस्त व्यक्तीला याच गोळ्या घेण्याचा सल्ला डॉक्टर्स देत होते. त्यामुळं कंपनी नावारुपाला आली आणि मोठ्या प्रमाणावर नफाही कंपनीनं कमावला. असं सांगितलं जातं की, कंपनीनं सन २०२०मध्ये कोरोनाच्या उद्रेकानंतर ३५० कोटी रुपयांच्या गोळ्यांची विक्री केली. तसेच वेगानं आपल्या स्पर्धक कंपन्यांच्या पुढे जात एका वर्षात ४०० कोटी रुपयांचा महसूल कमावला.

झेरॉक्स आणि बिसलेरीशी होतेय डोलोची तुलना

पॅरासिटामोल गोळ्या म्हणजेच डोलो-६५० असं आता समिकरण झाल्याचं पहायला मिळत आहे. त्यामुळं सहाजिकचं फोटोकॉपी काढणाऱ्या झेरॉक्स कंपनीची मशीन आणि मिनरल वॉटर विक्री करणारी बिसलेरी कंपनीशी डोलो कंपनीची तुलना केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com