esakal | कोरोनामुळे मानसिक आरोग्यावर परिणाम;भारतात आत्महत्यांच्या घटनांमध्ये वाढ
sakal

बोलून बातमी शोधा

coronavirus

कोरोनामुळे अनेकांचे स्वास्थ हरविले असून नैराश्‍य, अति ताणाच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर येत आहेत. स्वतःला इजा करणे, जीवन संपविणे अशा चिंताजनक घटनामंध्येही वाढ झाला आहे.

कोरोनामुळे मानसिक आरोग्यावर परिणाम;भारतात आत्महत्यांच्या घटनांमध्ये वाढ

sakal_logo
By
पीटीआय

नवी दिल्ली - कोरोनाच्या संसर्गाच्या भीतीने लॉकडाउनमध्ये गेले काही महिने घरात राहिल्यानंतर आता बाहेरच्या बदलेल्या जगाशी जुळवून घेणे हजारो लोकांना कठीण वाटत आहे. यामुळे भारतात अनेकांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाल्याचे होत असल्याने दिसत आहे. मानसिक ताणातून नैराश्‍येपासून अगदी आत्महत्येचे टोकही गाठले जात आहे. 

इजा करुन घेण्याचे प्रमाण वाढले 
कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती आणि लॉकडाउनमध्ये कोरोना नियंत्रणात येण्याऐवजी बाधितांच्या वाढत्या संख्येमुळे अनेक जणांच्या चिंतेत भरत पडली आहे. नवी जीवनशैली, अस्वास्थ्य, बेरोजगारी, आर्थिक समस्या आणि रोजचे ताणतणाव याला सामोरे जात असतानाच कोरोनामुळे निर्माण झालेल्या अंधाऱ्या पोकळीमुळे अनेक जणांना काळजीने घेरले आहे. सुरुवातीला सौम्य दिसणारी ही लक्षणे पुढे अति तीव्रही होत जातात. या टप्प्यात स्वतःला इजा करून घेण्याचे प्रमाण वाढते, असे मानसशास्त्रज्ञ, मानसोपचार तज्ज्ञ आणि नवी दिल्लीतील अशोका सेंटरचे संचालक अरविंदर सिंग यांनी सांगितले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

चार महिन्यांत ९० आत्महत्या 
कोरोनामुळे अनेकांचे स्वास्थ हरविले असून नैराश्‍य, अति ताणाच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर येत आहेत. स्वतःला इजा करणे, जीवन संपविणे अशा चिंताजनक घटनामंध्येही वाढ झाला आहे. गुजरातमध्ये १०८ आप्तकालिन रुग्णवाहिका सेवेकडे लॉकडाउनच्या काळात एप्रिल ते जुलै या काळात स्वतःला जखमी केल्याच्या ८०० तर आत्महत्येच्या ९० घटनांची नोंद झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. दिल्ली, उत्तर प्रदेश, ओडिशासह बहुतेक राज्यांमध्ये अशा घटना घडत असल्याचे दिसून येत आहेत. यासाठी मानसिक तणावाखाली असलेल्या रुग्णांना कसे हाताळायचे, त्यांच्यावरील उपचाराचे प्रक्षिणही देशातील आरोग्यासंबंधी, वैद्यकीय व मानसोपचार संस्थामध्ये देण्यात येत आहे. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

नैराश्‍येची कारणे... 
- कोरोना संसर्ग होण्याची भीती 
- ताप, खोकला झाल्यास काळजी वाढणे 
- आर्थिक चणचण, नोकरी जाणे, कर्जाचे हप्ते भरणे 
- भविष्यातील अनिश्‍चतता 
- शिक्षण, विवाह 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

जे मानसिक रुग्ण बरे होण्याच्या मार्गावर होते त्यांच्यावर लॉकडाउनचा परिणाम झालाच शिवाय याआधी कधीही लक्षणे नसलेल्यांमध्येही ताण व चिंतांशी निगडित आजार उदभवले. 
डॉ. आनंद नाडकर्णी, मानसोपचारतज्ज्ञ