'हर घर तिरंगा'ला अद्भूत प्रतिसाद, पंतप्रधान मोदी खुश; म्हणाले, तिरंग्याची ताकद काय आहे हे.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PM Narendra Modi

पंतप्रधान मोदींनी लोकांना तिरंग्यासोबतची त्यांची छायाचित्रं शेअर करण्याचं आवाहन केलंय.

'हर घर तिरंगा'ला अद्भूत प्रतिसाद, पंतप्रधान मोदी खुश; म्हणाले, तिरंग्याची ताकद काय आहे हे..

नवी दिल्ली : स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त (Independence Day) देशभरात सुरू करण्यात आलेल्या 'हर घर तिरंगा' मोहिमेला मिळालेल्या अद्भूत प्रतिसादाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी कौतुक केलंय. मी खूप आनंदी असून हे सगळं अभिमानास्पद असल्याचं पीएम मोदींनी म्हटलंय.

पंतप्रधान मोदींनी ट्विटमध्ये लिहिलंय की, ''हर घर तिरंगा (Har Ghar Tiranga Mahotsav) मोहिमेला मिळालेल्या अप्रतिम प्रतिसादाबद्दल मी आनंदी असून हे सगळं अभिमानास्पद आहे. विविध क्षेत्रातील लोकांचा विक्रमी सहभाग आम्ही पाहत आहोत. आझादीचा अमृत महोत्सव साजरा करण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे.'' हर घर तिरंगा चळवळीच्या अधिकृत वेबसाइटवर पंतप्रधान मोदींनी लोकांना तिरंग्यासोबतची त्यांची छायाचित्रं शेअर करण्याचं आवाहन केलंय. आतापर्यंत दोन कोटींहून अधिक सेल्फी अपलोड करण्यात आले आहेत.

हेही वाचा: Yogi Adityanath : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी

दरम्यान, नरेंद्र मोदींनी मोहिमेचा एक भाग म्हणून देशभरात विविध ठिकाणी आयोजित केलेल्या उत्सवांची झलकही शेअर केलीय. लेह आणि लडाखमध्ये 'आझादी का अमृत महोत्सव' साजरा करणाऱ्या मुलांची व्हिडिओ क्लिप शेअर करत मोदी म्हणाले, "हर घर तिरंगा मोहिमेला पाठिंबा देणाऱ्या या तरुणांचं मी कौतुक करतो." आदल्या दिवशी पंतप्रधान मोदींनी नवी दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी राष्ट्रकुल 2022 गेम्समधील सर्व पदक विजेत्यांशी संवाद साधताना, राष्ट्रध्वजाची ताकद आणि युद्धग्रस्त युक्रेनमधून विद्यार्थ्यांना वाचवण्यात त्याचं महत्त्व याबद्दलही बोलले. खेळाडूंना संबोधित करताना पीएम मोदी म्हणाले, 'तिरंग्याची ताकद काय आहे, हे आम्ही काही काळापूर्वी युक्रेनमध्ये पाहिलंय. तिरंगा केवळ भारतीयांसाठीच नाही तर इतर देशांतील लोकांसाठी रणांगणातून बाहेर पडण्यासाठी संरक्षण कवच बनलाय.'

हेही वाचा: स्वातंत्र्य दिनापूर्वीच कुलगाममध्ये दहशतवाद्यांकडून ग्रेनेड हल्ला; एक जवान शहीद

Web Title: Independence Day 2022 Pm Narendra Modi On Response To Har Ghar Tiranga Campaign Says Overjoyed And Proud

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..