स्वातंत्र्य दिनापूर्वीच कुलगाममध्ये दहशतवाद्यांकडून ग्रेनेड हल्ला; एक जवान शहीद

या ग्रेनेड हल्ल्यापूर्वी राजौरी जिल्ह्यातील लष्कराच्या तळावर पहाटे दोन दहशतवाद्यांनी हल्ला केला होता.
Indian Army
Indian Armyesakal
Updated on
Summary

या ग्रेनेड हल्ल्यापूर्वी राजौरी जिल्ह्यातील लष्कराच्या तळावर पहाटे दोन दहशतवाद्यांनी हल्ला केला होता.

जम्मू-काश्मीरमधील कुलगाम (Kulgam Jammu and Kashmir) जिल्ह्यात शनिवारी झालेल्या ग्रेनेड हल्ल्यात (Grenade Attack) एक पोलीस शहीद झाल्याची दुःखद बातमी समोर येत आहे. कुलगाममधील कैमोह (Qaimoh) इथं ग्रेनेड हल्ला झाला होता, यात मेंढर येथील पोलीस कर्मचारी ताहिर खान जखमी झाला होता.

काश्मीर पोलिसांनी (Kashmir Police) दिलेल्या माहितीनुसार, ताहिर खानला अनंतनाग येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं होतं, तिथं त्याचा मृत्यू झाला. काश्मीर पोलिस झोनच्या अधिकृत ट्विटवरुन ही माहिती देण्यात आलीय. ट्विटमध्ये लिहिलंय, “काल रात्री कैमोह (कुलगाम) इथं ग्रेनेड हल्ल्याची माहिती मिळाली. या दहशतवादी घटनेत पूंछचा पोलीस कर्मचारी ताहिर खान जखमी झाला. त्याला उपचारासाठी जीएमसी हॉस्पिटल (अनंतनाग) इथं हलवण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान तिथं त्याचा मृत्यू झाला.

Indian Army
Yogi Adityanath : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी

या ग्रेनेड हल्ल्यापूर्वी राजौरी जिल्ह्यातील लष्कराच्या तळावर पहाटे दोन दहशतवाद्यांनी (Terrorist) हल्ला केला होता. या हल्ल्यात चार जवान शहीद झाले असून जवानांनी दोन्ही दहशतवाद्यांचा खात्मा केला. दोन्ही दहशतवादी पाकिस्तानस्थित जैश-ए-मोहम्मदचे होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Why did India waive cotton import duty?
Latest Marathi News Live Update
IMD monsoon delay forecast for India 2026
Mamata Banerjee reaction on Abhishek Banerjee attack
Marathi News Esakal
www.esakal.com