
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी मिळालीय.
Yogi Adityanath : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी
लखनौ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Uttar Pradesh CM Yogi Adityanath) यांना जीवे मारण्याची धमकी मिळालीय. याबरोबरच पीआयएल कार्यकर्ते देवेंद्र तिवारी (Devendra Tiwari) यांनाही धमकी देण्यात आलीय. याप्रकरणी पोलिसांनी एफआयआर (FIR) नोंदवला असून देवेंद्र तिवारी यांच्या घरी धमकीचं पत्र सापडलंय.
यूपीमधील कत्तलखाने बंद करण्याप्रकरणी सीएम योगी यांना धमक्या मिळाल्याचं सांगण्यात येतंय. सलमान सिद्दीकी या संशयितानं त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचं वृत्त आहे. यूपी पोलिसांनी (UP Police) धमकीच्या पत्राची दखल घेतली असून आलमबाग पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदवला आहे.
पाच दिवसांपूर्वी बॉम्बने उडवण्याची धमकी
दरम्यान, पाच दिवसांपूर्वीही सीएम योगी यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. व्हॉट्सअॅप मेसेज मिळाल्यानंतर, लखनौ पोलिसांना (Lucknow Police) सतर्क करण्यात आलं. हा संदेश मिळाल्यावर पोलिसांनी सुशांत गोल्फ सिटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला. यूपी पोलिस कंट्रोल रूम 112 च्या व्हॉट्सअॅपवर धमकीचा संदेश पाठवण्यात आला होता, ज्याची माहिती लखनऊ पोलिसांनी शेअर केली होती.