Independence Day 2023 : 75 वर्षात लाल किल्ल्यावरून पंतप्रधानांनी कोणत्या प्रमुख घोषणा केल्या?

उत्तराखंडला नवीन राज्याचा दर्जा देण्यापासून ते सवलतीच्या दरात रेशन देण्यापर्यंत
Independence Day 2023
Independence Day 2023esakal

Independence Day 2023 : उत्तराखंडला नवीन राज्याचा दर्जा देण्यापासून ते सवलतीच्या दरात रेशन देण्यापर्यंत, गेल्या 75 वर्षांत देशाच्या पंतप्रधानांनी लाल किल्ल्यवरून अनेक घोषणा केल्या. जाणून घ्या लाल किल्ल्यावरून देशाच्या पंतप्रधानांनी कोणत्या मोठ्या घोषणा केल्या.

स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून देशाचे पंतप्रधान सरकारने केलेल्या कामांविषयी आणि देशासमोरील आव्हानांविषयी बोलत असतात. त्याचसोबत अनेक घोषणा करत असतात. प्रत्येक पंतप्रधानांनी आपापल्या पद्धतीने हे काम केलं आहे. यावेळी पंतप्रधान मोदी 10 व्यांदा लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करणार आहेत. यावेळी ते काय बोलणार हे जाणून घेण रंजक ठरेल कारण लाल किल्ल्यावरील हे भाषण त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचं भाषण असणार आहे.

Independence Day 2023
Curd Benefits For Health साखर की मीठ? दही कशासोबत खाणे ठरेल फायदेशीर, जाणून घ्या

गेल्या 75 वर्षांत देशाच्या पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून अनेक घोषणा केल्या. देशाच्या दोन पंतप्रधानांना लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून तिरंगा फडकवता आला नव्हता. हे पंतप्रधान होते गुलझारीलाल नंदा आणि चंद्रशेखर. पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, लाल बहादूर शास्त्री आणि इंदिरा गांधी यांचा कार्यकाळ देशाच्या विकासासाठी, चीन आणि पाकिस्तानशी लढण्यात आणि त्याची भरपाई करण्यात खर्च झाला. मात्र, दरम्यानच्या काळात भारताची प्रगती होत राहिली.

Independence Day 2023
Health Tips: या लोकांनी चुकूनही भेंडीचे सेवन करू नये, फायद्याऐवजी होईल मोठे नुकसान

जेव्हा जेव्हा हे सर्व पंतप्रधान लाल किल्ल्यावर पोहोचायचे तेव्हा ते गरिबी आणि देशाची भूक मिटवण्याबाबत बोलायचे. इंदिरा गांधींच्या कार्यकाळात पहिली अणुचाचणी झाली. पंचायत राजचे सध्याचे स्वरूप हे राजीव गांधी यांची देणगी आहे. डिजिटल इंडियाच्या सध्याच्या स्वरूपामध्ये राजीव गांधींचीही मोठी भूमिका आहे.स्वातंत्र्याच्या 76 व्या वर्धापन दिनानिमित्त, गेल्या 75 वर्षांत लाल किल्ल्यावरून देशाच्या पंतप्रधानांनी कोणत्या घोषणा केल्या हे आज पाहू.

Independence Day 2023
Mumbai Health News : मुंबईकरांनो डोळ्यांची घ्या काळजी ; डोळ्यांच्या संसर्गाचे आठवड्याभरात बाराशेहून अधिक रुग्ण

PM नरेंद्र मोदी : वारसा ते एकता

पंतप्रधान म्हणून मोदींनी आतापर्यंत नऊ वेळा लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केले आहे. पहिल्या टर्ममध्ये ते आपल्या जुन्या सहकाऱ्यांच्या धर्तीवर देशाला संबोधित करत राहिले, म्हणजे देशाचा विकास इत्यादी. मात्र नंतर त्यांनी स्पष्ट घोषणा करण्यास सुरुवात केली. 2022 मध्ये त्यांच्या पाच घोषणांवर चर्चा झाली, ज्यामध्ये त्यांनी विकसित भारताचा उल्लेख केला, गुलामगिरीतून मुक्त होण्याची शपथ, वारशाचा अभिमान, एकतेचे व्रत आणि येत्या 25 वर्षांत भारत कसा असेल.

Independence Day 2023
Health Tips: वाढणारं वजन कमी करणार आले, पोटाचा घेर होणार कमी

मनमोहन सिंग : तरुणांसाठी स्किल मिशन जाहीर

आर्थिक उदारीकरणाचे जनक म्हणून ओळखले जाणारे मनमोहन सिंग यांना लोक मूके पंतप्रधान म्हणत असतील, परंतु त्यांचे संपूर्ण लक्ष सामान्य माणसाच्या आणि देशाच्या आर्थिक विकासावर राहिले आहे. लाल किल्ल्यावरून त्यांनी जे भाषण केलं आहे त्यावरून याची उपरती होते. त्यांच्या प्रत्येक भाषणात दहशतवाद, भ्रष्टाचार हे मुद्दे होते. 2008 मध्ये त्यांनी लाल किल्ल्यावरून कौशल्य विकास मिशनची घोषणा केली, जी आज भरभराटीला येत आहे. तरुणांना मदत करण्यात आघाडीची भूमिका बजावत आहे. 2012 मध्ये त्यांनी कौशल्य विकास प्राधिकरणाची घोषणा केली.

Independence Day 2023
Health Tips : शरीरात या कॅल्शिअमची कमी असेल तर Muscles Cramps जास्तच दमवतात!

अटलबिहारी वाजपेयी: अल्पसंख्याकांच्या संरक्षणाचे वचन आणि चांद्रयानची घोषणा

1998 मध्ये पोखरण चाचणीनंतर अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान म्हणून लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करत होते. अणुचाचणी युद्धासाठी नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी अणुचाचणीचा पाया रचण्याचे श्रेय इंदिरा गांधींना दिले. अल्पसंख्याकांना संपूर्ण सुरक्षा देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. 2003 च्या त्यांच्या शेवटच्या भाषणात चांद्रयान अवकाशात पाठवण्याची घोषणा केली होती. उत्तराखंड, झारखंड आणि छत्तीसगड या तीन नवीन राज्यांची निर्मिती देशाच्या प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाची असल्याचेही त्यांनी सांगितले. अनेक प्रतिकूल परिस्थिती असतानाही पाकिस्तान आणि चीनशी चर्चा थांबवण्याचे ते कधीही समर्थक राहिलेले नाहीत. भ्रष्टाचार हा त्यांच्यासाठी नेहमीच कळीचा मुद्दा राहिला आहे.

Independence Day 2023
Health Tips: या लोकांनी चुकूनही भेंडीचे सेवन करू नये, फायद्याऐवजी होईल मोठे नुकसान

इंद्रकुमार गुजराल : भ्रष्टाचाराविरुद्ध सत्याग्रहाचा नारा

1997 साली लाल किल्ल्यावरून त्यांनी प्राथमिक शिक्षण हा मूलभूत अधिकार बनवण्याची घोषणा केली, जी देशासाठी अत्यंत महत्त्वाची ठरली. आर्थिक स्वराजबाबतही ते बोलले. राजकारणात महिलांना योग्य सन्मान मिळत नसल्याची खंत व्यक्त केली. भ्रष्टाचाराविरुद्ध सत्याग्रहाचा नाराही त्यांनी दिला.

Independence Day 2023
Yawning & Health : सतत येणाऱ्या जांभईकडे दुर्लक्ष करणं महागात पडेल; वेळीच ओळखा हे आजार

एच डी देवेगौडा: अनुदानित दरात रेशन आणि उत्तराखंडला नवीन राज्याचा दर्जा

एच डी देवेगौडा यांनी 1996 मध्ये लाल किल्ल्यावरून फक्त एकदाच देशाला संबोधित केले होते. स्वत:ला शेतकरी संबोधून ते म्हणाले की, त्यांना गरिबांच्या वेदना कळतात. यावेळी त्यांनी उत्तराखंडला नवीन राज्याचा दर्जा दिला, गहू आणि तांदूळ सवलतीच्या दरात देणे यासह इतर अनेक कल्याणकारी योजना जाहीर करून सर्वांना चकित केले.

Independence Day 2023
Monsoon Health Tips : पावसाळ्यात चुकूनही करू नका 'या' 5 गोष्टींचं सेवन

पीव्ही नरसिंह राव: प्रत्येक भाषणात पाकिस्तानला इशारा दिला

राव यांनी पाच वेळा पंतप्रधान म्हणून देशाला संबोधित केले. यावेळी ते आर्थिक सुधारणांच्या मदतीने देशाला पुढे नेण्याविषयी बोलत राहिले. हा तो काळ होता जेव्हा देशाने उदारीकरण योजनेअंतर्गत जगासाठी आपले दरवाजे उघडले. त्यानंतर भारताने मागे वळून पाहिले नाही. पण, राव यांच्या महत्त्वाच्या घोषणांमध्ये गरिबी निर्मूलन, पायाभूत सुविधांचे बळकटीकरण राहिले. आपल्या प्रत्येक भाषणात पाकिस्तानला इशारा देण्यात ते कमी पडले नाहीत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com