Karnataka Assembly : धजद होणार किंगमेकर ?

स्वबळाचा नारा अन् सत्तेचाही दावा; उमेदवारीबाबत पक्षाची संयमी भूमिका
Karnataka Assembly , politics
Karnataka Assembly , politicsesakal

Karnataka Assembly - राज्यात सुमारे १५ टक्के वक्कलिग समुदायाची मते आहेत. शिवाय जुन्या म्हैसूर-कर्नाटक विभागात धजदचा अधिक प्रभाव आहे. त्यामुळे प्रत्येक विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकीत या विभागातूनच धजदला अधिक जागा मिळतात.

त्या जोरावर धजदने १९९९ ला विधानसभा निवडणुकीत १० जागा, २००४ ला ५८, २००८ ला २८, २०१३ ला ४० तर २०१८ ला ३७ जागांवर विजय मिळविला. सध्या धजदचा लोकसभा व राज्यसभेत प्रत्येकी एक सदस्य आहे.

तर राज्यात तीन वेळा पक्षाने सत्तेत सहभागी होत दोन वेळा मुख्यमंत्रिपदही मिळविले. धजदचे सर्वेसर्वा एच. डी. देवेगौडा यांचे पुत्र एच. डी. कुमारस्वामी दोन वेळा मुख्यमंत्रिपदावर विराजमान झाले. मात्र, दोन्ही वेळा त्यांना दोन वर्षांच्या आत पायउतार व्हावे लागले.

तीन महिन्यांपूर्वीच धजदने राज्यातील ९३ विधानसभा मतदारसंघांसाठी सर्वात आधी पहिली यादी जाहीर करत राज्यात आघाडी घेतली होती. मात्र, धजदने दुसरी यादी जाहीर करण्यासाठी ‘वेट अँड वॉच’चे धोरण अवलंबिले आहे. भाजप व काँग्रेसकडून उमेदवार निश्चित झाल्यानंतरच धजदकडून उमेदवारांची घोषणा होणार असल्याचे बोलले जाते.

दोन्ही पक्षाची यादी अंतिम होताच यातील नाराज धजदमध्ये प्रवेश करू शकतात. मात्र, दुसरीकडे धजदला लागलेली गळती थांबविण्यात पक्षश्रेष्ठींना यश आलेले नाही. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्र्वभूमीवर अनेक आजी-माजी आमदार, माजी मंत्री, प्रभावी नेते धजदला सोडचिठ्ठी देत भाजप व काँग्रेसशी घरोबा करत आहेत.

तर काही नेते दुसऱ्या पक्षात प्रवेशाच्या मार्गावर आहेत. एकीकडे पक्षातून गयारामांची संख्या वाढता असताना गृहकलह वाढल्याने धजद पक्षासमोर दुहेरी आव्हान उभे ठाकले आहे. हसन विधानसभा मतदारसंघातील धजदच्या उमेदवारीवरून माजी पंतप्रधान एच. डी. देवैगौडा यांची मुले एच. डी. कुमारस्वामी आणि एच. डी. रेवण्णा यांच्यात गृहकलह वाढला आहे.

Karnataka Assembly , politics
Mumbai BEST Bus : बेस्ट खरेदी करणार ५० मेगावॉट वीज; लोकेश चंद्र

या मतदारसंघातून पत्नी भवानी यांना धजदकडून उमेदवारी देण्याची मागणी रेवण्णा यांनी केली आहे. भवानी यांना डावलून दुसऱ्याला पक्षाने उमेदवारी दिल्यास बंडखोरीचा इशाराही त्यांनी दिला आहे. मात्र, एच. डी. कुमारस्वामी यांनी हसनमधून सामान्य कार्यकर्त्याला संधी देण्याचे सूतोवाच केले आहेत.

धजदला राज्यातील सत्तेवर तीनवेळा विराजमान होण्याची संधी मिळाली. तर एच. डी. कुमारस्वामी दोन वेळा मुख्यमंत्रीही बनले. मात्र, जुना म्हैसूर-कर्नाटक विभाग वगळता धजदला मुंबई-कर्नाटक, हैदराबाद-कर्नाटक, बृहन्बंगळूर, मध्य कर्नाटक, किनारपट्टी प्रदेश या भागात अपेक्षित यश मिळवता आलेले नाही.

Karnataka Assembly , politics
Pune News : न काढलेल्या कर्जाचे हफ्ते फेडण्याची वेळ

संयुक्त जनता दलापासून फारकत घेत स्वतंत्र पक्षाची स्थापना होऊन २४ वर्षे झाली आहेत. मात्र, धजदला अद्याप वक्कलिग व काही प्रमाणात मुस्लीम व दलित मतदार वगळता अन्य समुदायातील मतदारांना वळविण्यात म्हणावे तसे यश आलेले नाही. दरम्यान, धजदने एकदा भाजप व दोनवेळा काँग्रेससोबत युती करत सत्तेची चव चाखली.

मात्र, वर्ष-दोन वर्षात सरकार कोसळले. त्यामुळे धजदचे सर्वेसर्वा, माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी काँग्रेस व भाजपवर टीकास्त्र सोडत स्वबळाचा नारा दिला आहे. यावेळी निवडणुकीनंतर धजद सत्तेवर येईल, असा दावाही त्यांनी केला आहे.

संयुक्त जनता दलाशी (जदयु) फारकत घेत १९९९ ला वेगळी राजकीय चूल मांडलेला धर्मनिरपेक्ष जनता दल अर्थात धजद हा राज्यातील तिसरा मोठा पक्ष आहे. माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या नेतृत्वात असलेल्या धजदची वक्कलिग समुदायावर मजबूत पकड आहे.

१९९९ मध्ये पहिल्यांदा लढलेल्या विधानसभा निवडणुकीत धजदने १०.४२ टक्के मते घेत १० जागा मिळविल्या. त्यानंतर २०१८ पर्यंत पक्षाने राज्यात सरासरी २० टक्क्यांपर्यंत मते मिळविली आहेत. होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्रिशंकू स्थिती निर्माण झाल्यास धजद किंगमेकर ठरण्याची शक्यता आहे.

- अक्षय सबनीस

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com