
Summary
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वातंत्र्यदिन भाषणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कौतुक केले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 200 व्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाची घोषणा केली.
मागासवर्गीयांच्या विकासासाठी विशेष उपक्रम राबवण्याचे आणि त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्याचे आश्वासन दिले.
शेतकरी, मच्छीमार आणि कष्टकरी नागरिकांच्या हितासाठी नवीन योजना व सुधारित सुविधा उपलब्ध करून देण्याचे वचन दिले.
भारताचा ७९ वा स्वातंत्र्यदिन देशभरात उत्साहात साजरा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून तिरंगा फडकवला आणि देशाला संबोधित केले. पंतप्रधान मोदी राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या कार्याचे कौतूक केले तसेच महान समाजसुधारक महात्मा फुलेंनाही नमन केले. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 200 व्या जयंती सोहळ्यानिमित्त कार्यक्रम सुरु करणार असल्याची घोषणा केली.