India Strikes at Terror Targets: भारताने जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेत मंगळवारी रात्री दीडच्या सुमारास ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी तळांवर क्षेपणास्त्रांनी हल्ला केला. बहावलपूर, कोटली आणि मुजफ्फराबाद येथे भारतीय लष्कराने हल्ले केले. यामध्ये सर्वात मोठा हल्ला बहावलपूर येथे करण्यात आला. या हल्ल्यात दहशतवादी मौलाना मसूद अजहरचा मदरसा पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे.