Massive uproar in Lok Sabha as India Alliance protests three bills moved by Amit Shah : अमित शहा यांनी आज लोकसभेत तीन महत्त्वाची विधेयके मांडली आहेत. ज्यामध्ये गंभीर गुन्हेगारी आरोपांखाली अटक झाल्यास पंतप्रधान, राज्यांचे मुख्यमंत्री, मंत्री आणि जम्मू-काश्मीरसह केंद्रशासित प्रदेशांच्या मंत्र्यांना पदच्युत करण्याची तरतूद आहे. मात्र, या विधेयकांना इंडिया आघाडीने तीव्र विरोध दर्शवला आहे. यावेळी लोकसभेत प्रचंड गदारोळ बघायला मिळाला.