pm narendra modi amit shah
esakal
Modi Government : नारी शक्ती वंदन विधेयकाशी जोडलेल्या १२३व्या घटनादुरुस्ती विधेयकावरून सत्ताधारी मोदी सरकार आणि विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीत लोकसभेत दोनतृतीयांश मतांकन सुरू असलेल्या संघर्षात कोणाची सरशी होते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज लोकसभेत केलेल्या भाषणांवरून त्यांची देहबोली सकारात्मक वाटत असली तरी, काल झालेल्या मतविभाजनाच्या आकड्यांनी सरकारची धाकधूक वाढवली आहे. तरीही शुक्रवारी सायंकाळी होणाऱ्या मतदानात ‘चमत्कार’ घडेल, अशी आशा सत्ताधाऱ्यांना आहे.