'भारत आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे समानार्थी शब्द'

वृत्तसंस्था
Saturday, 28 September 2019

इम्रानसाहेबांनी हे चांगले काम केले असून, त्याबद्दल आम्ही त्यांचे अभिनंदन करतो. तेच आता आमच्या संघटनेचा जगभर प्रचार करत आहेत.

नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा केवळ भारतात असून तो फक्त भारतासाठी आहे, जगात आमची शाखा कोठेही नाही. पाकिस्तानला संघावर राग आहे, म्हणजे त्यांचा भारतावरदेखील रोष आहे. भारत आणि रा. स्व. संघ हे दोन समानार्थी शब्द असल्याचा दावा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संयुक्त महासचिव कृष्णगोपाल यांनी केला आहे. 

जगानेही भारत आणि संघाकडे एकाच दृष्टीने पाहावे अशी आमची इच्छा आहे, या दोन भिन्न गोष्टी असू शकत नाहीत. इम्रानसाहेबांनी हे चांगले काम केले असून, त्याबद्दल आम्ही त्यांचे अभिनंदन करतो. तेच आता आमच्या संघटनेचा जगभर प्रचार करत आहेत.

दहशतवादाने पीडित असलेल्या आणि त्यांना विरोध करणाऱ्या लोकांना आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघदेखील याविरोधात असल्याचे समजले, त्यामुळेच इम्रान हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका करत आहेत. त्यांना फार काही काम न करता यामुळे प्रसिद्धी मिळत असल्याचेही गोपाल यांनी नमूद केले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या :

- अजित पवारांच्या डोळ्यांत पाणी, आमच्या कुटुंबात का गृहकलह करता : पवार

- लिंबाचं लोणचं चवीनं खाणाऱ्यांनो, ही बातमी वाचाच!

- भन्नाट फिचर्सचे वन प्लसचे स्मार्ट टीव्ही लाँच; किंमत माहितीय?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India and RSS are the synonyms said RSS joint secretary general Krishnagopal