esakal | अजित पवारांच्या डोळ्यांत पाणी, आमच्या कुटुंबात का गृहकलह करता : पवार
sakal

बोलून बातमी शोधा

ajit pawar gets emotional in between press conference

सुप्रिया, पार्थ आणि आता रोहितच्या बाबतीतही अशाच बातम्या पसरविल्या जात आहेत. आमचे कुटुंब मोठे असले तरी ज्येष्ठाचेच आम्ही सर्व ऐकतो. यावेळी अजित पवार यांच्या डोळ्यात पाणी आले. 

अजित पवारांच्या डोळ्यांत पाणी, आमच्या कुटुंबात का गृहकलह करता : पवार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : पवार हे खूप मोठे कुटुंब आहे. आमच्या कुटुंबात कसला गृहकलह आहे. कशाला आमच्या घरात गृहकलह करता. सुप्रिया, पार्थ आणि आता रोहितच्या बाबतीतही अशाच बातम्या पसरविल्या जात आहेत. आमचे कुटुंब मोठे असले तरी ज्येष्ठाचेच आम्ही सर्व ऐकतो. यावेळी अजित पवार यांच्या डोळ्यात पाणी आले. 

माझ्यामुळे पवारसाहेबांची बदनामी झाली : अजित पवार

अजित पवार म्हणाले, की शरद पवार यांची चौकशी होत असताना मी नव्हतो, अशी बातमी चालविण्यात आली. पण, बारामतीत एवढा पूर आला होता, की आम्ही सर्वोतोपरी मदत केली. पुण्यात आलो तेथून मुंबईला येत असताना खूप गर्दी होती. त्यामुळे मला मुंबईत येण्यास दुपार झाली. या कारणाने सिल्व्हर ओक येथे आले नाही. 

याबद्दल मी सर्वांची माफी मागतो : अजित पवार

तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर बेपत्ता असलेले माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आज (शनिवार) तब्बल 19 तासांनंतर शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी पोहचले याठिकाणी त्यांची कौटुंबिक चर्चा झाल्यानंतर अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेणार हे स्पष्ट झाले होते. तर, शरद पवार यांनी हसत-हसत अजित पवार सर्व माहिती देतील असे म्हटले होते. त्यानंतर त्यांनी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे प्रमुख नेते उपस्थित होते.

loading image